नगर-दौंड रस्त्यावर कोळगाव फाट्याजवळ एसटी बसला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-दौंड रस्त्यावर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाट्यापासून पुढे कुकडी कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ शुक्रवारी (दि.१५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नगर-श्रीगोंदा एसटी बसला अपघात होऊन त्यात १५ ते २०प्रवासी जखमी झाले आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यातील चार प्रवाशांना नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून यामध्ये बसचालकासह भानगाव येथील एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते. उर्वरित जखमी प्रवाशांवर कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, नगरमधून रात्री साडेसात वाजता श्रीगोंदा-नगर बस श्रीगोंदा तालुक्यातील दौंड-नगर रस्त्यावर कोळगाव फाट्यापासून अगदी काही अंतरावर कुकडी कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ आली असता दौंडहून नगरकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकची व या बसची समोरासमोर धडक झाली. 

यात एसटी बसला समोरच्या बाजूने जोराची धडक बसली. यावेळी या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ते ३० प्रवाशांपैकी १५ ते २० प्रवाशी जखमी झाले असून यात बसचालकासह भानगाव येथील एक प्रवासी जास्त जखमी झाला आहे. अपघातातील चौघा जखमींना नगरला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

हा अपघात झाला तेव्हा पाऊस सुरु होता. अपघात झाल्यानंतर दौंड-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक तरुणांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक व बस बाजूला.घेण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे बेलवंडी पोलिसांबद्दल तरुणांनी असंतोष व्यक्त केला. तरूण व पोलिसांसह घटनास्थळी श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड, शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी जखमींना मदत केली. 

दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी नगर-श्रीगोंदा बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे याठिकाणी असलेल्या ओढ्याच्या पुलावरून बस खाली कोसळून ओढ्यात पडली होती. पुन्हा त्याच ठिकाणी असा अपघात झाल्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.