पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवार दिनांक.१७/०९/२०१७ रोजीचा वाढदिवस भाजपा शहर जिल्हाध्यक्ष तथा खा.दिलीप गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. 

                           

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यादिवशी सकाळी ९:३० वाजता सावरकर पुतळा, चौपाटी कारंजा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात श्री गणरायाची विधिवत महाआरती करण्यात येईल. ११:३० वाजता गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेमधील अनाथ मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात येईल. 

त्यानंतर दुपारी १२:०० वाजता भाजपा पार्टी कार्यालय, गांधी मैदान येथे नगरसेवक किशोर डागवाले व भाजपा मध्य मंडल प्रमुख नरेंद्र कुलकर्णी यांच्या वतीने प्रभाग क्रं. २१ मधील नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत रुपये दोन लाखाच्या विम्याचे मोफत विमापत्र वाटप करण्यात येईल. 

दुपारी ३:०० वाजता खासदार दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना गॅस वितरण करण्यात येईल. अशी माहिती भाजपा शहरजिल्हा संघटन सरचिणीस किशोर बोरा, प्रसिद्धी प्रमुख गौतम दीक्षित, उपमहापौर श्रीपाद छिंदम व गटनेते सुवेंद्र गांधी यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.