शहीद जवानाच्या अंत्यविधीवेळी गॅलरी कोसळली. नऊ महिला जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शहीद जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर (वय ३२) यांना शासकीय इतमामात मोठया शोकाकूल वातावरणात शुक्रवारी (दि.१५) अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या गाडीला मंगळवारी (दि.१२) हिमाचल प्रदेशातील केरी येथे अपघात झाला होता. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानंतर त्यांचे पार्थिव शोधण्यात येत होते. घटनेनंतर दोन दिवसानंतर घटनास्थळापासून ३० ते ४० किमी अंतरावर पार्थिव सापडले. अकोळनेर येथे शुक्रवारी दुपारी पार्थिव आणल्यानंतर गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्यांचे पार्थिव घराजवळ आणले असता नागरिकांची मोठी गर्दी होवून त्यांच्या घराचा स्लॅब कोसळून ८-१० जण जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत अलका लहानू रासकर (वय ४०), दिव्या अमोल रासकर (वय १९) व आसराबाई सुखदेव गारुडकर, अलका अरुण धोत्रे या महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तर शैलाबाई मच्छिंद्र जाधव (वय ६५) आशा घुसाळे (वय ३०), चंद्रकला नानासाहेब जाधव (वय ५५), शाकूबाई नारायण गारुडकर (वय ७०) या महिलांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.