कर्जत न्यायालयाच्या सुरु असलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ पडले उघडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत येथे सुरु असलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा काही भाग अचानक पावसाने पडल्याने सदर निकृष्ट कामाबाबत कर्जत बार असो. ने आज संतप्त भावना व्यक्त करून या कामाची, काम करणार्या ठेकेदाराची व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्याची चौकशीची मागणी केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कर्जत येथील भांडेवाडी येथे कर्जत न्यायालयाच्या भव्य इमारतीचे काम सध्या जोरात सुरु आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या सहा कोटीच्या कामात निकृष्ट काम उभारले जात असल्याचे आज समोर आले. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पश्चिमेकडील मागच्या बाजूच्या बांधकामाच्या वरच्या भागात बांधण्यात आलेली स्लापवरील सुरक्षा कठडा रात्रीच्या पावसाने पडला. 

उर्वरित काम आज फोडून काढण्यात आले. सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु असून अनेक ठिकाणी इमारतीला आत्ताच भेगा पडलेल्या स्पष्ट दिसत आहेत. इमारतीवर टाकलेला स्लाप अनेक ठिकाणी गळत असून बांधकामात चांगली वाळू वापरण्या ऐवजी माती मिश्र्रीत दगडी कच वापरण्यात आली असल्याचे पहावयास मिळ्त आहे. 

आज या बांधकाम पडल्यानंतर कर्जत बार असो. च्या पदाधिकार्यांनी पुन्हा पत्रकारासह या इमारतीची पाहणी केली असता बांधकामातील सिमेंट च्या जागी भरलेली माती हाताने काढता येत होती. बांधकामात विविध ठिकाणी लेव्हल चुकल्याचे स्पष्ट दिसत होते. 

न्यायाधीशांच्या कोर्ट हॉल मध्ये भिंतीतून पाणी येत असल्याचे पहावयास मिळत होते. या सर्व निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी बार असो. चे अध्यक्ष अंड बाळासाहेब बागल यांनी केली तर ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम च्या अधिकार्याची संगनमताने हे निकृष्ट काम सुरु असल्याचा घणाघाती आरोप धनंजय राणे यानी केला.

 यावेळी नवनाथ कदम, सुरेश पोटरे, गहिनीनाथ नेवसे, कैलास शेवाळे, राम दहिवळकर, विनोद शिंगटे, युवराज राजेभोसले, हरिश्चंद्र राउत, संग्राम ढेरे, आदीसह अनेक वकील उपस्थित होते. कर्जत बार असो. ने नुकतीच या निकृष्ट कामाबाबत जिल्हा न्यायाधीश याचे कडे नुकतीच तक्रार केली होती.

त्यामुळे दि १३ सप्टे रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी कर्जत येथे येऊन या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामात सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र त्यानंतर दोन दिवसातच या कामातील काही भाग पावसाने पडल्याने या निकृष्ट कामावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाला असून सदर कामाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

न्यायालयाच्या महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी या इमारतीमध्ये स्ट्रोन्ग रूम असते या इमारतीमध्ये बांधण्यात आलेल्या स्ट्रोन्ग रूमच्या दोन भिंतीना चार बोटाची फट ठेवण्यात आली असून या खोलीला स्ट्रोन्ग रूम कसे म्हणायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.