अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिस कोठडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अशोक दादाराव ढवळे (वय २०) यास अटक दि.15 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दि.19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीस अशोक दादाराव ढवळे रा. पिंपरखेड,ता.ज़ामेखड. याने दि. 20 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास फूस लावून घरातून पळविले. ढवळे हा सुरुवातीला या मुलीला पुणे येथे घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार करून पुन्हा गुजरातमधील अहमदाबाद जिल्हातील मुंदरा येथे घेऊन गेला व तेथेही त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला. 

दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोहेकाँ. विठ्ठल चव्हाण, पोकाँ. गणेश साने, पोकॉं. गहिनीनाथ यादव, पोकाँ. बाबासाहेब बडे यांच्या पथकाने या मुलीचा शोध घेतला असता, ती गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील मुंदरा या गावात असल्याचे समज़ले. 

दि.14 सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने आरोपीसह पीडित मुलला ताब्यात घेतले. पोलिसांनी ढवळे याच्यावर गुन्हा दाखल करून दि.15 रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दि.19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.