शौचालय पथकातील पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सफाई कामगारांना शिट्या का वाजवता? या कारणावरून जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कोपरगाव शहरात घडला. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पालिका कार्यालय ते शहर पोलीस ठाण्यादरम्यान मोर्चा काढला होता.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हागणदारीमुक्‍त योजना राबवून कोपरगाव शहराला दीड कोटीचे पारितोषिक मिळवून दिले. शहरामध्ये मोकळ्या जागेत उघड्यावर कोणीही शौचास बसू नये यासाठी पालिकेच्या वतीने “ओडीएफ’ योजनेंतर्गत शहरात 28 ठिकाणी कर्मचारी पथकाची नियुक्‍ती केली आहे. प्रत्येक पथकामध्ये 5 कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यांना ठरवून दिलेल्या परिसरामध्ये दररोज पहाटे 5 ते 6ः30 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते 10ः30 वाजेपर्यंत पाहणी करून परिसरात उघड्यावर कोणी शौचास बसल्यास शिट्टी वाजवून दक्ष करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. 13) शहरातील हनुमाननगर, इंगळेनगर भागातील गिरमेवस्तीच्या मोकळ्या जागेजवळ पालिकेचे काही कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. त्याच परिसरात राहणारे नितीन पवार व त्यांच्या पत्नीने कर्मचाऱ्यांना मनात राग धरून जबर मारहाण केली.

यामध्ये दिलीप डाके, संजय कसाब जखमी झाले आहेत. कसाब यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. तर, डाके यांना तोंडाला व इतर ठिकाणी मुकामार लागला आहे. तसेच, गनी मुनीर पठाण, गिरीश डाके, विजय लोंढे, मधुकर वालेकर, कैलास आढाव, प्रशांत उपाध्याय यांनाही या परिसरात मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या मारहाणीच्या निषेधार्थ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. पालिका कर्मचाऱ्यांनी संरक्षण मिळावे, मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्याकडे निवेदन देऊन केली. 

या मोर्चावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, नगरसेवक कैलास जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे, उपाध्यक्ष सोपान शिंदे यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले की, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरकरांनी सहकार्य करावे. जर कोणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार नाही
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण झाली. संबंधित मारणाऱ्या व्यक्‍तीला काही नागरिकांनी मारहाण केली. पालिका कर्मचाऱ्यासह तो व्यक्‍ती जबर जखमी झाला असताना कोणीही पोलिसांत रितसर तक्रार दिली नाही. मात्र, या वादावरून रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यामध्ये गर्दी होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.