क्रीडा विकासासाठी मिशन फूटबॉल वन मिलियन उपयुक्त - पालकमंत्री प्रा. शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सतरा वर्षाखालील जागतिक फूटबॉल स्पर्धेचे औचित्य साधून आयोजित केलेला मिशन फूटबॉल वन मिलियन उपक्रम जिल्हा व राज्यातील क्रीडा विकासासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

वाडिया पार्क येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित मिशन फूटबॉल उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांच्यासह बाळासाहेब बोराटे, विनोद शिंदे, सतीश झेंडे, सुजीत जाधव, क्रीडाधिकारी श्री. देवकाते, दीपाली बोडके आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, सतरा वर्षाखालील जागतिक फूटबॉल स्पर्धा भारतात होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा विकासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांत आज मिशन फूटबॉल एक मिलीयन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक विद्यार्थी या उपक्रमाचा भाग आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासोबतच चांगल्या आरोग्यासाठी खेळ उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सुरेखा कदम यांनी विद्यार्थ्यांमधील उत्साह हा नगरकरांचा क्रीडा संस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन दाखवितो. अशा उपक्रमात नगरकर नेहमीच पुढे असतात, असे त्या म्हणाल्या.

प्रारंभी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्य़ेने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेहरु युवा केंद्रामार्फत घेतलेल्या निबंध आणि लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.