भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या भाषणाला पिपल्स हेल्पलाईनचा विरोध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धार्मिक स्थळाचा दुरोपयोग प्रतिबंधक कायदा 1988 च्या तरतुदी नुसार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, दसर्‍याला होणार्‍या भगवान गडावरील मेळाव्यास पंकजा मुंडे यांना भाषणासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी देवू नये. अन्यथा जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत औरंगाबाद खंडपिठात प्रशासन व सरकार विरोधात दाद मागितली जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

ग्रामीण विकास खात्यात तीन वर्षापासून पंकजा मुंडे मंत्री आहेत. मात्र या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात कामे झाली नाही. ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यात आलेला नाही. 1964 ग्रामदान कायद्याचा वापर करुन राज्यात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करुन घरकुल वंचितांसाठी घरे बांधता आली असती. 

मात्र यामध्ये पुढाकार न घेता राजकीय हित साधण्यासाठी दसर्‍या मेळाव्याच्या भगवान गडावरुन भाषण करण्यात मुंडे यांना स्वारस्य वाटत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्या निमित्त भगवान गडावरील सभेवरुन मोठे वादंग निर्माण झाले होते. धार्मिक स्थळाचा दुरोपयोग प्रतिबंधक कायदा 1988 च्या तरतुदी नुसार पंकजा मुंडे यांना भगवान गडाचा वापर राजकीय कारणासाठी करता येणार नाही. 

यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना गडावर सभेसाठी परवानगी न देण्याची मागणी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी पंकजा मुंडे यांना केलेला विरोध काद्याशी सुसंगत असल्याचे स्पष्ट करुन, भगवान गडाचा वापर राजकीय सभेसाठी होवू नये.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. निवेदनावर अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, प्रकाश थोरात, अ‍ॅड.लक्ष्मण पोकळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे आदिंची नांवे आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.