अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांत हाणामारी ,नागरिकांची पळापळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीप चालकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या वेळी दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. दगड लागल्याने सचिन पवार हा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी साडेअकरा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर ही घटना घडली. यामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांमधे पळापळ सुरू झाली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जखमीवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील भांडकर ट्रान्सपोर्ट जवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जिपगाडया अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या असतात. तेथे गाडीचा नंबर, प्रवाशी पळविणे यावरून जीपचालकांत नेहमीच वाद होतात.

गाडीच्या नंबरवरून सचिन पवार व इंदिरा नगर, पाथर्डी येथील एका जीपचालकामध्ये बुधवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हाणामारी सुरू झाली. या वेळी सचिन चंदू पवार (वय-30 वर्ष) रा. तनपुरवाडी. याला चार ते पाच जणांनी जबर मारहाण केली. दगड डोक्यात लागल्याने सचिन जागेवरच कोसळला. त्याला मारणारे पसार झाले. इतर लोकांनी रिक्षामध्ये टाकून सचिनला उपजिल्हा रुग्णालय़ात दाखल केले.

तेथे प्राथमिक उपचार करून सचिनला नगरला पाठविले. घटनेची माहीती समताच पोलिस घटनास्थळी आले. मारहाण करणाऱ्यांची जीपगाडी पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून लावली आहे. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल नाही. ज़खमी पवार याच्या जबाबावरून गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.