शेवगावमध्ये कुंटणखान्यावर छापा,२ अल्पवयीन मुलीना पोलिसांनी घेतले ताब्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील एका कुंटणखान्यावर फ्रीडम फर्म या पुणे येथील सेवाभावी संस्थेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल दि. १३ रोजी रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात दोन अल्पवयीन मुली तसेच एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या वेळी एक मोबाइल, काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या छाप्यात दोन परप्रांतीय अल्पवयीन मुली तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या मीनाबाई मुसवत यांना ताब्यात घेतले आहे. तर प्रदीप मुसवत फरार आहे. मीना मुसवत ही अगोदर दाखल असलेल्या पिटाच्या गुन्ह्यात फरार होती. यासंदर्भात फ्रीडम फर्मचे समाजसेवक सत्यजित देसाई यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

या सेवाभावी संस्थेला येथे अल्पवयीन मुली व महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून प्रथम त्यांनी खात्री करून घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन त्यांनी या व्यवसायाबद्दल माहिती देऊन सदर मुली व महिलांना मुक्त करणे गरज़चे असल्याचे सांगितले.

त्यांनी केलेल्या मागदर्शनानुसार या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बनावट ग्राहक पाठवलेल्या अमोल जवरे यांनी इशारा करताच पंचासमक्ष छापा टाकला. या वेळी तेथे दोन अल्पवयीन मुली व कुंटणखाना चालक मीनाबाई मुसावत मिळून आल्या. 

या मुलींनी फोनवरून त्यांना बोलावून घेतल्याचे व मीनाबाई मुसावत व प्रदीप मुसावत सदर कुंटणखाना चालवत असल्याचे सांगितले. या वेळी केलेल्या अंगझडतीत रोख ३०० रुपये व ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलींना अवैध वेशा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. .

या छाप्यात फ्रीडम पर्मचे संस्थेचे आश्विन राठोड, शिबू मंडल, सेरिना डिसुझा, नम्रता साबळे, कॅथरिन राजा तसेच स्थानिक पोलीस सहभागी झाले होते.

शहर व तालुक्यात लॉजिंगची सोय असलेल्या अनेक हॉटेलामधून अनैतिक वेशा व्यवसाय चालतो. तसेच शिवाजी नगर या भागात राजरोसपणे या व्यवसायातील महिला रस्त्यावर उभे राहून ग्राहकांना खुणावीत असतात. तालुक्याबाहेरील पैठण, गेवराई, गंगाूर, नेवासा, पाथर्डी, औरंगाबाद, बीड या भागातील कुख्यात गुन्हेगारांचा या कुंटणखान्यात वावर असतो. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. बाहेरील स्वयंसेवी संस्था व पोलीस पथके येथे येऊन कारवाई करतात. मात्र, स्थानिक पोलीस गप्प असतात.

गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर स्थानिक पोलिसांनीही कडक भूमिका घेण्याची गरज आहे. सुमारे पाच वषांर्पूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योती प्रिया सिंग यांनी स्वत: छापा घालून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवस हा व्यवसाय बंद होता. आताही व्यापक कारवाई होण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.