अशोक लांडे खून प्रकरणातील आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या सुटकेला आव्हान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणातील आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या सुटकेला आव्हान देण्यात आले आहे. फिर्यादी शंकरराव राऊत यांनी सुटकेसंदर्भात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. फिर्यादी शंकर राऊत यांचा उशिरमाफीचा अर्ज मंजूर केल्याने आ. कर्डिले यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

आ. कर्डिले यांच्या सुटकेस आव्हान दिल्याने या खटल्याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे.केडगाव येथे मे २००८ मध्ये अशोक लांडे यांची हत्या करण्यात आली होती. केबल, वायर, टॉमीसह अन्य हत्याराने अशोक लांडे याचा खून करण्यात आला होता.

याबाबत शंकरराव राऊत यांनी फिर्याद दाखल केल्याने कोतकर पिता पुत्रांसह आ. कर्डिले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कोतकर पिता-पुत्रांना याप्रकरणी कोर्टाने शिक्षा ठोठावली. तर आ. शिवाजीराव कर्डिले यांची सुटका करण्यात आली होती.

या सुटकेस शंकर राऊत यांनी पुन्हा आक्षेप घेतला असून त्यांच्या सुटकेस आव्हान दिले आहे. आ. कर्डिले यांच्या सुटके विरोधात राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात १२ ऑगस्ट २०१६ रोजी उशिर माफीचा अर्ज दाखल केला होता. त्यावर १८ एप्रिल २०१७ रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी आ. कर्डिले उपस्थित होते.

न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी १८ ऑगस्ट रोजी उशिर माफीचा अर्ज मंजूर केल्याने आ. कर्डिले यांच्या विरोधात हा खटला पुन्हा चालणार आहे. फिर्यादी राऊत यांच्यावतीने ॲड. जितेंद्र गायकवाड, ॲड. पंकजा पांडे तसेच अनिलकुमार पाटील हे काम पाहत आहेत.

काय  आहे अशोक लांडे खून प्रकरण ???
             शेवगावचा  अशोक लांडे हा नगर शहरात लॉंटरी व्यवसाय करून केडगाव येथे रहात होता.या अशोक ला मारहान करून त्याचा अपघात असल्याचा बनाव करून केडगाव उड्डाणपूल जवळ त्याला टाकण्यात आले. यामध्ये भानुदास कोतकर यांनी अशोकला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र प्रत्यक्षदर्शी शंकर राउत यांनी हा अपघात नसून खून असल्या बाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानुसार न्यायालयाने १५६ (३) नुसार भानुदास कोतकरसह माजी महापौर संदीप कोतकर ,सचिन व अमोल कोटकर यांच्या सह आदींवर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात आ.शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा रुग्णालयतील राजेश ढवन व भाऊसाहेब उनवणे यांना हाताशी धरून बनावट कागदपत्र तयार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता त्यामुळे पोलीस तपासात आ.कर्डिले यांनाही अटक करण्यात आली होती. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.