अकोल्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयात विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यातील मन्याळे (ता. अकाेले) येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव (५५) यांनी बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंत्रालयाच्या पहिल्या माळ्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनासमाेर विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न केला. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पाेलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. भैरवनाथ जाधव यांच्यावर यशाेमंदिर पतसंस्थेचे कर्ज हाेते. नापिकीमुळे ते कर्ज फेडण्यास असमर्थ ठरले हाेते.

कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी गावातील विहिरीत बसून उपाेषणही केले हाेते. शिर्डीचे खासदार सदाशिव लाेखंडे यांनी कर्ज भरण्याचे अाश्वासन देत त्यांना उपाेषण मागे घ्यायला लावले हाेते. मात्र यानंतरही कर्जमाफी न झाल्यामुळे जाधव यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.