मुलीची छेड काढल्यावरून विध्यार्थ्याला वर्गात घुसून मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे मुलीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा-बारा जणांच्या जमावाने वर्गात घुसून मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळी हातगाव येथील हनुमान विद्यालय व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीची सांगळे नावाच्या विध्यार्थ्याने छेड काढली. हा प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितल्यावर मुलीच्या नातेवाईकांनी विद्यालयातील इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेच्या वर्गात घुसून सांगळे नावाच्या मुलाचा शोध घेतला.

मात्र तो मिळून न आल्यामुळे त्याचा मित्र अभिषेक खोडदे यास शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी मारहाण करण्यास विरोध केला असता त्याचा राग येवून जमावाने विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून त्यांनाही मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी विद्यालयातील शिक्षक योगेश दत्तात्रय घोडके (रा. केडगाव) यांच्या फिर्यादीवरून मारूती चौरे, विलास चौरे, आकाश चौरे, वैभव चौरे, अक्षय चौरे व इतर ४-५ जणांविरूध्द (सर्व रा. नेप्ती, ता. नगर) यांच्याविरूध्द मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोसई एम.बी. गोरे हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.