राहुरीत बिबट्याचा शेतकऱ्याच्या घरात मुक्काम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंधरा दिवसांपासून रोज शेळी, बकरांवर हल्ला करून राहुरी तालुक्यातील उंबरे गावात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याने आता मानमोडी परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात मुक्काम ठोकला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेतीच्या कामासाठी जेव्हा शेतकरी वस्तीवर गेला तेव्हा बिबट्याच्या डरकाळीने तो भयभीत झाला. जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या आता थेट घरात घुसल्याने तो माणसावर हल्ला करू शकतो, त्यामुळे वनविभागाने या भागात तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

उंबरे शिवारात मानमोडी परिसरात प्रदीप कारभारी ढोकणे यांचे शेतात जुने घर आहे. या घरात सध्या कुणी राहात नाही; परंतु शेतीउपयोगी साहित्य त्यांनी घरात ठेवले आहे. काही दिवसांपासून सायंकाळी निर्मनुष्य असलेल्या या वस्तीवर थेट बिबट्याने मुक्काम थाटला आहे. 

घराच्या आसपास कुणी गेले, तर डरकाळी फोडून तो येणाऱ्या माणसाची पळता भुई थोडी करतो. सध्या या भागात कापूसवेचणी सुरू असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे ती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात कोळसा उपलब्ध होत नसल्याने सुरू झालेल्या भारनियमनाचा फटका या भागातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. 

दिवसा वीज नसल्याने रात्री वीज आल्यावर मोटार चालू करणे गरजेचे असताना बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाणार कोण, या भागात वस्तीवर राहणारे शेतकरी अंधार पडल्यावर घराबाहेर पडण्यास तयार नाही. याच बिबट्याने वस्तीलगत असलेल्या एकनाथ वाघ यांच्या घरासमोरील बोकडावर हल्ला केला. 

रानातला बिबट्या आता थेट रानच्या वस्तीवर मुक्कामी आला आहे. जनावरे सोडून तो आता माणसावर हल्ला करू शकतो, हे लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ पिंजरा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.