श्रीगोंद्यात 2 तरुणांकडून मामाच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोघा तरुणांनी चक्क आपल्याच जवळच्या नात्यातील मुलीचे अपहरण करण्याची घटना बुधवारी (दि.१३) दुपारी श्रीगोंदा तालुक्यात घडली. या मुलीला कारमध्ये भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने नेले जात असताना एका गावातील ग्रामस्थ तरुणांनी ही कार अडवून मुलीची सुटका केली. संबंधीत मुलीला पळविणाऱ्या तिघांना या गावातील तरुणांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील एक महाविद्यालयीन तरुणी श्रीगोंदा येथे रोज बसने शिक्षणासाठी येत होती. बुधवारी ती कॉलेज संपल्यानंतर तिच्या गावाजवळील बसस्थानकावर उतरुन एका तरुणाबरोबर घरी जात होती. त्याचवेळी पाठीमागून एक कार आली अन त्यांच्याजवळ येऊन थांबली.

या कारमधून या मुलीचे जवळचे नातेवाईक असलेले दोन तरुण व तिसरा अनोळखी तरुण खाली उतरले. त्यांनी संबंधित मुलीला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह केला. त्यास मुलीने विरोध केला असता त्यांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसविले. यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या मुलाने या तिघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनीही त्याला चोप देत मुलीला कारमध्ये टाकून पळवून नेले. 

तेव्हा या मुलाने तात्काळ याबाबत मुलीच्या घरच्यांना माहिती दिली. तोपर्यंत हे तिघेही तरुण संबंधित मुलीला घेऊन भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने चालले होते. त्यावेळी पुढच्या गावातील युवकांनी ही कार अडविण्याचा प्रयत्न केला. पण कार भरधाव वेगाने पुढे निघून गेली. त्यांनी तात्काळ पुढील गावातील तरुणांना फोनवरुन घटनेची माहिती देत कार अडविण्यास सांगितले. 

भरधाव वेगाने येणारी कार पाहून तेथील तरुणांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून कार अडविली. या कारमधील तिघांना पकडून बेदम चोप दिला. कार पलटी करुन तिच्या काचा फोडल्या. त्याचवेळी काही तरुणांनी पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. 

कारचालक या तरुणांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला असून, या तरुणीचे नातेवाईक असलेल्या दोघा तरुणांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथे दोघांनाही समज देऊन सोडून देण्यात आले. ही घटना नात्यातीलच असल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही..

संमतीने प्रकरण मिटवल्यामुळे गुन्हा दाखल केला नाही.
दरम्यान या घटनेबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आधी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आम्ही फिर्याद घेण्यास सुरुवात केली होती. परंतु पुन्हा सदर प्रकरणातील मूले ही नातेवाईक असल्यामुळे मुलीच्या वडिलांनी फिर्याद देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा नोंदविला नाही. त्यांनी संमतीने प्रकरण मिटवले असून तसे त्यांचे तक्रार नसल्याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आले असल्याचे श्री. पोवार यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.