कर्जमाफीच्या अर्ज भरण्याची मुदत वाढवावी ; पाचपुतेंची राज्य सरकारकडे मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्ज माफी दिली. याद्वारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा व आधार मिळाला. याद्वारे भरण्यात येणारे अर्जाची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपत आहे. काही तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी अद्याप या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या संदर्भात पाचपुते यांनी चार मंत्र्यांना निवेदन देऊ हि मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा यात समावेश आहे. वरील मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पाचपुते यांनी म्हटले आहे की," छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्माम योजने अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांकडून अर्ज भरले जात आहे. या ऑनलाई प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक नाहीत. शेतकऱ्यांचे बोटांचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर डिटेक्ट होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे."

इंटरनेटचा वेग संथ, विजपूरवठा व सर्व्हर डाऊन या सर्व गोष्टींचे त्रास सहन करावा लागत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून ऑनलाई कर्जमाफी प्रक्रियेची १५ सप्टेंबर रोजी संपणारी मुदत वाढून मिळावी. ज्याने करून कोणीही यापासून वंचित राहणार नाहीत, अशी मागणी पाचपुते यांनी केली आहे.

दोन आठवड्यात १ हजार शेतकऱ्यांचे भरले अर्ज राज्य सरकार ने केलेली शेतकरी कर्ज माफीचे अर्ज भरण्यास सुरवात केली. माऊली कार्यालयावर शेतकऱ्यांना मोफत सेवा पुरविण्यात येत आहे. १३ सप्टेंबर पर्यँत सुमारे एक हजार शेतकऱ्यांचे अर्ज आम्ही भरू शकलो यांचे समाधान आहे. यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या महत्वकांक्षी योजने पासून शेतकरी वंचित राहावू नये म्हणून मुदत वाढीची मागणी आपण केली आहे. - बबनराव पाचपुते (माजी मंत्री)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.