एस.टी. जळाल्याच्या गुन्ह्यात मनसेच्या कार्यकर्त्याची निर्दोष सुटका.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील प्रलंबित एस.टी. डेपो च्या प्रश्नावर नगर येथे मनसेच्या वतीने सुरु असलेल्या उपोषणाचे वेळीच कर्जत बसस्थानकातील एस.टी. जळाल्याच्या गुन्ह्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे त्यांच्या सह २५ कार्यकर्त्यांवर सत्र न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहित जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीश अशोकराव भिलारे यांनी सर्वाची निर्दोष मुक्तता केली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कर्जत तालुक्यासाठी एस टी डेपो व्हावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने सातत्याने आंदोलने करून पाठपुरावा केला जात होता दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्जत मध्ये आंदोलन केले मात्र त्याचा उपयोग न झाल्याने शेवटी मनसेच्या २५ कार्यकर्त्यांनी एस टी महामंडळाच्या विभाग नियंत्रक याचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. 

सनदशीर मार्गाने मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना व त्यांना तालुक्यातून मिळणारा वाढता पाठींबा पाहून समाजकंटकाना ते पाहवले नाही व २६ जानेवारी २०११ रोजी रात्री २ ते अडीच चे दरम्यान समाजकंटकानी कर्जत बसस्थानकावर उभ्या असलेल्या बस मधील एक बस जाळली. 

या घटनेस जबाबदार धरून राजकीय दबावापोटी नगर येथे आंदोलन करत असलेल्या मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, राहुल निम्बोरे, रविंद्र सुपेकर, राजू धोतरे, धरमसिंग परदेशी, दत्ता शिपकुले, नामदेव थोरात, अविनाश राउत आदी सह २५ कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली व अहमदनगर कर्जत व येरवडा येथील कारागृहात २१ दिवस तुरुंगवास सोसावा लागला. 

हा खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी सर्व पक्षांनी कर्जत तालुका ३ दिवस बंद ठेऊन निषेध नोंदवला होता तरीही त्यावेळी शासनाने गुन्हा मागे घेतला नव्हता. त्यामुळे सदरच्या गुन्ह्याची केस नगर येथील सत्र न्यायालयात सुरु होती या सर्वाच्या वतीने अड महेश तवले, दिपक भोसले संजय वाल्हेकर, संजय दुशिंग व निलेश देशमुख यांनी काम पाहिले व या गुन्ह्यात सत्याचा विजय होत काल जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीश अशोकराव भिलारे यांनी सर्वाची निर्दोष मुक्तता केली. 

या निकालानंतर सर्वांनीच समाधान व्यक्त करताना पोटरे यांनी आपल्याला सहकार्य करणार्या सर्वाचे आभार मानताना कर्जत एस टी डेपोचा प्रश्न अद्यापि प्रलंबित असून सध्या भाजपा सेनेच्या वादात परिवहन मंत्री डेपोच्या कामात तांत्रिक अडचणी सांगून दिरंगाई करत असतील तर ना. शिंदे यांनी मुख्यमंत्र्याच्या संपर्कातून डेपोला मान्यता मिळवावी अशी अपेक्षा व्यक्त करताना कर्जत तालुक्याला जोपर्यंत एस टी डेपो मिळत नाही तो पर्यत मनसे या प्रश्नाचा पाठपुरावा करतच राहिल व हा लढा आम्ही सुरूच ठेऊ असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.