कर्जमाफीचे फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ.दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस शिल्लक असताना गेल्या दोन दिवसांपासून नेटवर्क बंद असल्याने तासनतास ताटकळत बसावे लागत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. दोनच दिवस बाकी असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शेतकरी कर्जमाफीसाठी आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, खासगी इंटरनेट केंद्र, कॉम्प्युटर इन्सिस्ट्यूट आदी ठिकाणी शेतकऱ्यांचे अर्ज भरले जात आहेत. राज्य शासनाने सन २००९ ते जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक पासबुक, कर्ज खाते क्र. तसेच महत्त्वाचे म्हणजे कर्जदार शेतकरी पती-पत्नी यांच्या हाताचे ठसे प्रत्यक्ष घेतले जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

तसेच जून २०१७ पयंर्तच्या शेतकऱ्यांना विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्याबद्दल प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असले तरी कर्जमाफीबाबत वेगवेगळे अध्यादेश काढण्यात येत असल्याने शेतकरी नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरताना आधार लिंकचे नेटवर्क बंद असल्याने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. 

सदरचे नेटवर्क यापूर्वीही अनेकवेळा बंद राहिल्याने शेतकऱ्यांना सेवा सुविधा केंद्राकडे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दरम्यान, सदरचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.