कुकडीच्या कर्मचा-यांना मिळणार साखरेचा गोडवा, कारखान्यातील कर्मचा-यांना १५% वेतनवाढ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कुकडी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचा-यांचे दृष्टीने सोमवार दि.११ हा दिवस स्वप्नवत ठरला. कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय कुकडीचे अध्यक्ष आ.राहुल जगातप यांनी जाहीर केले. कारखाना कार्यस्थळावर कामगारांशी संवाद साधताना आ.जगताप यांनी कारखान्यातील कर्मचा-यांना १५% वेतनवाढ व हंगामी सेवेत आसणा-या कर्मचा-याना सेवेत कायम करण्याचा निर्णय जाहीर केला.आ.जगतापांनी हा निर्णय जाहीर करताच कामगारांनी फटाक्यांची आताषबाजी करुन व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या वेळी बोलताना आ.जगताप म्हणाले की, मागील हंगामात अत्यंत कमी गाळप झाले. या वर्षीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी कामगारांची जबाबदारी मोठी असनार आहे. या गळीत हंगामामध्ये ७.०० लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्टे आहे. 

साखर कारखाना चालवताना शेतकरी व सभासदां प्रमाणे कामगार महत्वाचा घटक आहे. कुकडी कारखाना एक परीवार आसुन त्यातील कामगार प्रमुख घटक आसल्याने त्यांचे प्रत्येक सुखदुःखात आम्ही त्यांचे मदतीसाठी तत्पर आसतो. या पुढेही कामगारांना कोणतीही मदत लागली तरी ती त्यांना केली जाईल, त्यामुळे त्यांनी कारखान्यासाठी प्रमाणीकपने काम करावे. 

सरकारचे धोरणाचाही साखर कारखान्यास तोटा होत आहे. साखर आयातीच्या धोरणामुळे उत्पादन कमी होऊनही साखरेचे दर उतरत चालले आहेत. कुकडीचे कामगारांचे पगार वेळेत केले जात आहेत. कारखान्याचे संस्थापक आदरणीय कुंडलिकराव (तात्या) जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार व्यवस्थित रित्या चालू आहे. 

सर्व कामगारांनी कुंडलिकराव (तात्या) जगताप, आमदार राहुलदादा जगताप व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष एकनाथ बारगुजे, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड, कामगार संघटना अध्यक्ष कल्याण जगताप, मुख्यशेतकी अधिकारी सुभाष कुताळ, बंडुपंत धारकर, चिफ इंजिनिअर भास्कर काकडे, डे. चिफ केमिस्ट गोपिनाथ पवार, चिफ अकौंटंट नारायण सरोदे, कामगार कल्याण अधिकारी अनिल कराळे, अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.