श्रीगोंद्यात महिलेवर पतीसमोरच अत्याचार.आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-श्रीगोंदा तालुक्यातील तीस वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून सदर घटनेतील आरोपी प्रमोद अर्जुन पानसरे (रा.घारगाव) याला बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात महिला अत्याचाराचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एक विवाहित महिला तिच्या पती व मुलांसह राहते. शुक्रवारी (दि.८) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी पानसरे हा दुचाकीवरून पीडित महिलेच्या घरासमोर आला. त्याठिकाणी आपल्या आजारी वडिलांना औषध देणाऱ्या पीडित महिलेच्या पतीला व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इसमाला त्याने विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली.

तेव्हा पीडित महिलामध्ये पडली. तेव्हा आरोपी पानसरे याने त्या महिलेलासुद्धा मारहाण करून दमदाटी केली व तुला पाहून घेईन असे म्हणत तो तिथून निघून गेला. त्यानंतर सोमवार दि. ११ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला, तिचा पती व मुले झोपलेली असताना आरोपी पानसरे याने पीडितेच्या घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. 

पीडितेच्या नवऱ्याने एवढया रात्री कोण दार वाजवतय म्हणून पाहिले तेव्हा आरोपी पानसरे असल्याचे त्यांना दिसले. आरोपीने दरवाजा न उघडल्यास दार तोडण्याची धमकी दिली त्यामुळे पीडितेच्या नवऱ्याने दार उघडले. त्यावर आरोपीने घरात येऊन तुझी बायको कुठे आहे मला तिच्याशी त्यादिवशीच्या भांडणाविषयी बोलायचे असल्याचे सांगितले. त्यावर पीडितेने व तिच्या नवऱ्याने पानसरे याला बाहेर जायला सांगितले. 

त्यावर आरोपीने पीडित महिलेच्या नवऱ्याला मारहाण करून सदर महिलेवर अत्याचार केला. या घटनेबाबत पीडित महिलेने बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद अर्जुन पानसरे याच्याविरोधात महिला अत्याचाराचा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे हे करीत आहेत. पतीसमोरच पत्नीवर अत्याचार झाल्यामुळे गावात व परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून त्यामुळे याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणातील आरोपी प्रमोद अर्जुन पानसरे यांच्यावर या आधीदेखील काही गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याच्या दहशतीमुळे सदर घटनेवेळी कुणीही हस्तक्षेप केला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.