दसरा मेळाव्याला ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भगवान गडावरील दसरा मेळाव्याला ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तुम्ही मेळाव्याविषयी तुमच्या भावना सांगितल्या, आता मी निर्णय घेईल, असे मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे दसऱ्याला भगवान गडावर येऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतील, असे समजते. दसरा मेळावा होणार की नाही, याबद्दल संभ्रमावस्था आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसऱ्याच्या दिवशी भगवानभक्तांचा मेळावा घेण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. 

गेल्यावर्षी गडावर राजकीय भाषण होणार नाही, असा निर्णय गडाच्या विश्वस्त मंडळाने घेतला. केवळ धार्मिक कार्यक्रम होतील, असे गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी जाहीर केले. त्यानंतर तणावाच्या परस्थितीमध्ये मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. 

पाच दिवसांपूर्वी माजी आमदार दगडू बडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, राहुल कारखेले, डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी मुंबई येथे ना. मुंडे यांची भेट घेऊन त्यांना मेळाव्याला येण्याचे निमंत्रण दिले. 

या वेळी मुंडे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. तुम्हीच मला गडाची कन्या मानली. नंतर गडावरून भाषण करण्यास बंदी केली. मला गडावरून राजकारण करायचे नाही. त्यामुळे मेळाव्याला येण्याबाबतचा माझा निर्णय तुम्हाला कळविन, असे मुंडे यांनी सांगितले. 

दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी धनंजय मुंडे बाबांच्या समाधीच्या दर्शनाला येण्याची शक्यता त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. धनंजय यांनी त्यांच्या पाथर्डीतील समर्थकांशी संपर्क साधला आहे. मेळावा व्हावा, अशी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मात्र, मुंडे काय निर्णय घेतात, यावरच सर्वकाही अवलंबून आहे. गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन सुरू केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.