खा. दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्यास यश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दौंड-नगर-मनमाड रेल्वे दुहेरी व विद्युती करणास केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. सुमारे २४७ कि. मी. रेल्वेलाईन राहणार आहे. याकामी खा. दिलीप गांधी यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

खा. गांधी म्हणाले की, १९९९ पासून मागणी होती. मागणीच्या आधारे सन २०१५ मध्ये केंद्र सरकारने दौंड-नगर-मनमाड रेल्वे दुहेरी व विद्युती करणाच्या सव्र्हेसाठी ९ कोटी ३७ लाख रुपयांची तरतुद केलेली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकी मध्ये नगर-दौंड-मनमाड रेल्वे लाईनच्या २४७ कि. मी. दुहेरी व विद्युती करणासाठी मंजुरी देण्यात आली.

मंजुरीमुळे मार्गावरील रेल्वेच्या प्रवासात जवळपास २-३ तासांची बचत होणार असून नवीन रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळणार आहे. या मार्गामुळे नगरकरांना आता रेल्वे प्रवास सुखकर होणार आहे. या मंजुरी निमित्त खासदार दिलीप गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना. नितीन गडकरी, (केंद्रीय वाहतुकमंत्री) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पियुष गोयल (केंद्रीय रेल्वे मंत्री) ना. सुरेश प्रभू (माजी केंद्रीय रेल्वे मंत्री) यांचे अभिनंदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.