दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्र चोरले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोन्याचे दागिने व भांडी पॉलिश करून देतो असे सांगत दोन अज्ञात चोरांनी एक तोळयाचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना नगर तालुक्यातील देहरे येथे सोमवारी (दि. ११) सकाळी साडेनऊ वाजता घडली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबतची माहिती अशी की, संतोष भाऊसाहेब काळे (रा. देहरे) यांच्या घरी दोन अनोळखी इसम आले. आम्ही कंपनीतर्फे आलो आहोत, मोफत सोनं व सोन्याची भांडी पॉलिस करून देतो असे सांगितले. त्यावर काळे यांनी नकार दिला असता हे सर्व मोफत असल्याचे सांगून प्रॉडक्टची चाचणी सुरू असल्याचे सांगितले.

सुरूवातीला पितळाचे भांडे घेवून त्यांनी त्याला चकाकी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी गळयातील सोने मागून त्यातील कचरा साफ करून देतो असे म्हटले. तेव्हा काळे यांनी घरातील एक तोळ्याचे मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी दिले. 

चोरटयांनी ते पाण्यात टाकून त्यात हळद टाकली व तुरटी आणण्यासाठी सांगितली असता काळे हे आत घरात गेले व त्यानंतर या चोरट्यांनी तेथून पलायन केले. तेव्हा काळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संतोष काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक फौजदार दळवी हे करत आहेत. दरम्यान, एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटयांचे चित्र टिपले गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.