संगमनेर तालुक्यातील पुल व भराव पावसात गेला वाहून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर तालुक्यातील डिग्रसं शिवारातील ठाकरवाडी (जाधव वस्ती) ला .जोडणारा मातीचा पुल रविवार दि. १० सप्टेबंर ला झालेल्या मुसळदार पावसात वाहून गेल्यामुळे येथील सुमारे २५० नागरीकाचां डिग्रस गावाशी पुर्णपणे संपर्क तुटला आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

डिग्रस गावच्या कडेला ओड्याच्या पलिकडे सुमारे ४० कुंटुबांची २५० लोकाची आदिवासी समाजाची लोकवस्ती असुन या लोकवस्तीस जाधव वस्ती असे नाव असुन या अदिवासी लोकांची शेतीही याच ठिकाणी असुन त्या शेतीवरच ह्या लोकांची उपजिवीका आहे डिग्रसं गाव ते ठाकरवाडी जोडणारा हा एकमेव ओढयातुन रस्ता असून स्वातंत्रप्राप्ती पासुन येथील या आदिवाशी ठाकर समाजाला रसत्याचा मोठा गंभीर प्रश्न उभा रहात होता.

पावसाळयात जिव मुठीत धरत येथील छोटी मुले ट्यूब रस्सीच्या सहाय्याने शाळेत शिक्षण घेण्यासाठी आटा पिटा करत तर महीला वर्गाचीही मोठी तांरांबळ उडत तर येथील तरुण उपजिवीका करण्यासाठी बाहेर गावी जाताना जीव मुठीत धरुण ४ महीणे ये-जा करत तर कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार कसे करणार असे अनेक प्रश्न निर्माण होईचे अनेक वर्ष प्रशासनाकडे लेखी तोंडी मागणी करुनही या पुलाचे काम होईना अखेरीस दोन महिन्यापूर्वी संगमनेर साखर कारखान्याकडून चार सिमेंट चे मोठे पाईप टाकत माती व मुरुमाचा भराव टाकून मातीचा पूल तयार करण्यात आला होता. मात्रं रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हा पूल वाहून गेला मातीचा भरावा तुटला.तर यामुळे डिग्रंस गावाशी ठाकरवाडी [जाधववाडी] चा संपर्क तुटल्याने येथिल कुटुंबाचे दैनंदिन जीवनमान कोलमडले आहे.

येथिल नागरीकांचे शेती हे एकमेव उपजिवीकेचे साधन असून हा पूल वाहून गेल्याने या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्मान झाला असुन पुन्हा एकदा पुर्वीचे दिवस पुढे सुरु झाल्याने शिक्षण आरोग्य रोजगाराचा प्रश्न ऐैरणीवर आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.