अकोल्यात किरकोळ भांडणातून पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  किरकोळ भांडणातून कुरबूर उडालेल्या नवरा-बायकोच्या भांडणाने गंभीर वळण घेतले. त्यात मद्यपी पतीने पत्नीवर चाकूने पोटावर सपासप वार केले व तिच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविण्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारी दीड वाजता उंचखडक बुद्रुक (ता. अकोले) येथील रानच्या शिवारात घडला.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

हल्लेखोर पती पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला नाशिक येथे हलवले गेले आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पना बाळासाहेब अडांगळे (वय 40) ही महिला गावाशेजारील पुंजा काशिनाथ मंडलिक यांच्या शेतात रोजंदारीच्या कामावर गेली होती. तेथे आज दुपारी मद्यपी पती बाळासाहेब हा गेला. पती पत्नीत किरकोळ कुरबूर झाली. त्याचे पर्यवसान मोठ्या भांडणात झाले. खिशातील चाकू काढून पती बाळासाहेब याने तिच्या पोटात घाईघाईने सपासपा वार केले. शिवाय, बरोबर असलेल्या कुऱ्हाडीने कल्पना हिच्या डोक्‍यावर वार केले.

कल्पनाच्या जोडीला असणाऱ्या दुसऱ्या महिलेने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, तिला त्याने जुमानले नाही. त्यात कल्पना गंभीर जखमी झाली. तिला तातडीने अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. मात्र, तिला उपचार देण्यास तेथे असमर्थता दाखवली गेली. त्यानंतर तेथून तिला संगमनेर येथे हलवले गेले. मात्र, तेथेही तिला उपचार मिळू शकले नाहीत. शेवटी तिला नाशिक येथे हलवले गेले. अकोले पोलीस ठाण्यात मात्र याची कोणतीही नोंद नसून याबाबत माहिती घेतली जात आहे, असे पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.