शहराला फक्त विकासकामांची आवश्यकता - आ.संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहराला फक्त विकासकामांची आवश्यकता आहे. इतर गोष्टींचा आवश्यकता नव्हती व राहणारही नाही. शहराला वैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न चालू असून, सत्ताधारी विकासकामात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. महापौर असताना सिना सुशोभीकरणाचे हाती घेतलेले काम तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या आडमुठे धोरण व अभ्यास नसल्याने बंद पाडण्यात आले. यामुळे आलेला निधी परत गेला. ही उणीव भरुन काढण्यासाठी संपुर्ण सीना सुशोभीकरणासाठी प्रयत्न चालू आहे. सीना पात्राची 95 टक्के मोजणी झाली आहे. दिवाळीपुर्वी सीना पात्रातील अतिक्रमण हटविण्यास प्रारंभ होवून, सिना सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रभाग क्र.28 रेल्वे स्टेशन येथील संजीवनी कॉलनीच्या रस्ता कॉक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ जैन ओसवाल नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन शांतीलाल गुगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.जगताप बोलत होते. याप्रसंगी किसनराव लोटके, नगरसेवक विजय गव्हाळे, नगरसेविका आशाताई पवार, संभाजी पवार, अभियंता श्रीकांत निंबाळकर, भालचंद्र जोशी, किशोर बळे, सुरेश चांडक, पारस चुडीवाल, मनोज कावळे, प्रकाश मते, चंद्रकांत शिपणकर, अभय ललवाणी, श्रीकृष्ण लांडगे, सुहास चांडक, दर्गाताई कावळे, सोनू शिपणकर, राजू शिपणकर, राजू जाधव, ठेकेदार शरद मेहेर, देवीदास बनसोडे, गोविंद सुर्यवंशी आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले की, पंचवीस वर्षापुर्वी स्थापन झालेल्या या कॉलनीचा परिसर शहराच्या हाकेच्या अंतरावर आहे. या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी होवून गेले व त्यांनी महापालिकेत विविध पदे भुषविली. मात्र या परिसराकडे दुर्लक्ष केले गेले. पुर्वी हा परिसर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात नसल्याने विकासकामे रखडले गेली. मात्र नगरसेवक विजय गव्हाळे व आशाताई पवार यांच्या पाठपुराव्याने रेल्वे स्टेशन परिसराचा विकासात्मक कायापालट झाला आहे. दोन्ही नगरसेवकांनी मल्हार चौक ते कायनेटीक चौक रस्ता, सिनानदी पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी तसेच परिसरात विविध नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले.

नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की, विकास हाच मुद्दा केद्रस्थानी मानून प्रभागात विविध कामे करण्यात येत आहे. प्रभागातील परिसरात भेदभाव न ठेवता आ.संग्राम अगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी विविध विकासकामे केली जात असल्याचे ते म्हणाले. उपस्थित नागरिकांनी अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी प्रभागातील नगरसेवकांचे आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.