डाॅ.शिंदे यांची सेवा कायम स्मरणात राहील: अंबादास शेळके

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डाॅ.बी.एम.शिंदे यांनी गेली ५ वर्ष खारे कर्जुने (ता.नगर) पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत फक्त ८ तासांची 'नोकरी'च केली नाही,तर पशुपालक शेतकऱ्यांना २४ तास 'सेवा' दिली. त्यांचे हे 'सेवाकार्य' खारे कर्जुने व परिसरातील गावांना कायम स्मरणात राहील.असे प्रतिपादन नगर कृ.उ.बा.समितीचे संचालक, युवा नेते अंबादास शेळके यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

खारे कर्जुने (ता.नगर) येथील पशुधन पर्यवेक्षक डाॅ.बी.एम.शिंदे यांना सहा.पशुधन विकास अधिकारी या पदावर बढती मिळाल्या बद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शेळके पुढे बोलताना म्हणाले,डाॅ.बी.एम.शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाचे अनेक उपक्रम व शिबिरांचे यशस्वीरीत्या आयोजन केले.त्याअंतर्गत गरजू शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.त्यांची ही नि:स्पृह सेवा शेतकरी बांधवांच्या कायम स्मरणात राहील.

डाॅ.बी.एम.शिंदे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, वैयक्तीक व शिबिरांच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती प्रात्यक्षीकांसह पशुपालकांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून दिला,याचे मानसिक समाधान आहे.त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन,पशुपालक शेतकरी बांधवां बरोबरच ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व प्रशासकीय विभागातील सहकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले,त्याबद्दल सर्वांचा कृतज्ञ आहे.

पशुपालकांनी आपल्या जनावरांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच काळजी घ्यावी.त्यांचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व अधिक दूध उत्पादन मिळविण्यासाठी पशुवैद्यकांच्या नेहमी संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे,असा सल्लाही दिला.यावेळी अनेक ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी मुख्याध्यापक पिसे सर,डाॅ.बाळासाहेब शेळके,डाॅ.सुनिल पादीर,पत्रकार महादेव गवळी,रशीद सय्यद,जान मोहम्मद सय्यद, भाऊसाहेब तांबे,चंद्रकांत ढवळे,विक्रम निमसे,अमोल निमसे,अमोल शिंदे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डाॅ.सुनिल पादीर यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.