कर्जत तहसील कार्यालयासमोर घातली सत्यनारायण महापूजा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील २२ गावांना वरदान ठरू शकणार्या तुकाईचारी साठी गेली सहा महिन्यापासून सत्याग्रह करणाऱ्या बाळासाहेब सूर्यवंशी याच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी व तुकाईचारी मंजुरीसाठी शासनाला सद्बुद्धी आणण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर तुकाईचारी कृती समितीच्या वतीने आज सत्यनारायन पूजा करण्यात आली. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कर्जत तालुक्यात तुकाई चारी व्हावी हि गेली अनेक वर्षाची मागणी केली जात असून न मिरजगाव सह कोभळी, चांदा, गुरवपिंपरी, आदीसह परिसरातील २२ गावांना याचा फायदा होणार आहे. यासाठी गुरवपिंपरीचे जेष्ठ नागरिक बाळासाहेब सूर्यवंशी हे अनेक वर्षापासून शासनाशी लढत आहेत. तीन वर्षापूर्वी त्यांनी गावातच आमरण उपोषण केले होते त्यावेळी आमदार असलेले राम शिंदे यांनी सत्ता येताच सहा महिन्यात हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याचा आग्रह केला होता.

मात्र सत्ता होऊन अडीच वर्ष झाले असताना अद्यापि या प्रश्नाकडे लक्ष देण्यात आलेले नसल्याने सूर्यवंशी यांनी सहा महिन्यापासून कर्जत तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे मात्र त्यास अद्यापि कोणताही प्रतिसाद शासनाकडून दिला गेला नाही म्हणून आज या गावातील नागरिकांनी एकत्र येत तुकाईचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्याचा संकल्प सोडत तहसील कार्यालयासमोर सत्यनारायण पूजा घालून शासनाला या प्रश्नाकडे सकारात्मक पाहण्याची सदबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते. प्रथम कृती समितीचे अध्यक्ष सुनील टकले यांनी प्रास्ताविक करताना या गावासाठी महत्वाच्या या प्रश्नाकडे शासनाने लक्ष न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. कृती समितीचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी चोंडीच्या पाण्यासाठी राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले होते व रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला होता.

तुकाईचारीसाठी ते मंत्रालय दणाणून सोडतील का असा प्रश्न उपस्थित करत या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास शिंदे यांनी तालुक्यात फिरू देणार नाही व ते जातील त्याठिकाणी भजन करू गळ्यात डफडे बांधू पायात चाळ घालू व जोरात आंदोलन करू असा इशारा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी सहा महिने एक जेष्ठ नागरिक आंदोलन करत आहेत व त्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत हि लाजिरवाणी गोष्ट असून असे होत असेल तर शासनाचा एकही प्रतिनिधीला तालुक्यात फिरू देणार नसल्याचे म्हटले बाळासाहेब साळुंके यांनी ना. शिंदे हे प्रश्न सोडवू शकतात मात्र त्याची मानसिकता नसून आता आपल्याला हातात बंदुका घेतल्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगत सर्वांनी हिंसक आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

यावेळी राजेंद्र गुंड, अंबादास पिसाळ, विष्णूपंत टकले आदीची भाषणे झाली. गेली अनेक दिवसापासून आंदोलन करणारे बाळासाहेब सूर्यवंशी यांनी तुकाईचारी दिलेल्या लढ्याची माहिती देताना आपण सर्वांनी पाठींबा देण्यासाठी केलेल्या या आंदोलनाबद्दल सर्वाचे आभार मानले. यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले शेवटी नायबतहसीलदर आल्हाट याना सर्वांनी निवेदन दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.