अत्याचाराच्या निषेधार्थ नाभिक समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यातील हातगाव-कांबी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल नाभिक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मूक मोर्चा काढला. मोर्चात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्राच्या बहुतांशी जिल्ह्यातील समाज सहभागी झाला. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

शहरातील गांधी मैदान येथून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा सुरू झाला. नगर जिल्ह्यासह पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, धुळे, बीड, जालना येथून येत लोक मोर्चात सहभागी झाले होते. गांधी मैदान काही क्षणात हजारो आंदोलकांच्या गर्दीने भरून गेले होते. 

आंदोलन स्थळी संयोजकांनी जोरदार तयारी केली होती. मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला काळी फित लावण्यासाठी संयोजक नेमण्यात आले होते. काही जणांनी नाभिक समाजाचा भगवा ध्वजही हाती घेतले होते. या मोर्चा स्थळी व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर फक्त काळी टी-शर्ट परिधान केलेल्या सहा मुली उभ्या होत्या. त्यांच्या तडाखेबाज भाषणाने गांधी मैदाना दणाणला होता. 

या मुलींनी जिवाजी महाले यांचा पराक्रम व स्वामी निष्ठेतून नाभिक समाजाचा गौरवशाली इतिहास सांगत गेल्या महिन्यात हातगाव येथे झालेल्या मुलीवरील अत्याचाराची घटना व त्यानंतर समाजावर झालेला परिणाम याची मीमांसा केली. मुलींच्या भाषणाला धार होती. 

शब्द प्रहारामुळे मुलींनी सामाजाच्या विवेकवादालाच हात घातला. ऐकणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभेबरोबर आत्मभान जागरूक होत होते. या मुलींच्या भाषणानंतर जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मूकपणे निघाला. 

त्यानंतर महिला, पुरूष आणि सर्वात शेवटी संयोजक व राजकीय नेते होते. चितळे रस्ता, तेली खुंट, कापडबाजार, पारशा खुंट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. मोहिनी कोरडे, स्वाती चौघुले, कोजागिरी राऊत, दिपाली शिंदे, नेहा शिंदे, जागृती सोनवणे या सहा मुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारासमोर उभे राहून निवेदन वाचून दाखविले. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून याचवेळी जात असलेल्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली. जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेत मुलींनी मागण्यांचे निवेदन दिले. महाजन यांनी आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन होणार नाही. आम्ही स्वत: या खटल्यात लक्ष देऊ असे आश्­वासन दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासन मुलींनी आंदोलकांना सांगितले. आंदोलकांनी यावर समाधान व्यक्त केले. खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड, आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी आंदोलनांना पाठिंबा दर्शविला. चितळेरोडवर शिवसेनेतर्फे आंदोलकांना नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

अशा आहेत मागण्या .
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, पीडिताना न्याय मिळण्यासाठी खटला नगर जिल्ह्याबाहेर चालवावा, आरोपींना खटल्याचा निकाल लागेपर्यंत जामीन मिळू नये, पीडित मुलीचे व कुटूंबाचे पूर्नवसनाची जबाबदारी शासनाने उचलावी, पीडिताला आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे

पोलिस बंदोबस्त तोकडा.
नाभिक समाजाच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बाहेरील जिल्ह्यातून देखील आंदोलक आले होते. संवेदनशील विषयावर मोर्चा असताना त्याला पोलीस बंदोबस्त कमी होता. याची माहिती घेतली असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी मात्र 'टॉयलेट' चित्रपट पाहण्यात मग्न होते, अशी माहिती पुढे आली. या मोर्चासाठी कोतवालीकडून सुमारे १५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.