पारनेर मध्ये सहावीच्या विध्यार्थ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर शहरातील सेनापती बापट विद्यालयाच्या गेट समोरून इयत्ता सहावीच्या विध्यार्थ्याला पळवून नेण्याची घटना सोमवारी (दि.११) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु मुलाने हुशारीने अपहरणकर्त्यांपासून आपली सुटका करून घेतली आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेनापती बापट विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या महेश राजू खेडेकर (वय-११) याचा इंग्रजी विषयाचा पेपर सुटल्यानंतर तो शाळेच्या बाहेर आला असता दुचाकीवरून आलेल्या (एम. एच १२ एक्स वाय ९८२२) अज्ञात दोन व्यक्तींनी महेशच्या तोंडावर रुमाल टाकून त्यास मोटारसायकलवर बसवून जामगाव रोडकडे घेऊन गेले. 

पारनेर शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या हवालदार वस्तीजवळ आल्यानंतर सदर अपहरणकर्त्यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता महेश याने अत्यंत चलाखीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन केले व जवळच असणाऱ्या सविता नितीन वैद्य यांच्या घरात आश्रय घेतला. 

घरातील गृहिणी सविता वैद्य यांना सदर प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मोबाईलवरून महेशचे आजोबा बाळासाहेब ठुबे याना फोनवर सदर घटनेची माहिती दिली. श्री. ठुबे यांनी लगेच या वस्तीवर येऊन महेश याला आपल्या ताब्यात घेतले.

दरम्यान महेशच्या हुशारीने त्याने स्वत:ची सुटका अपहरणकर्त्यांच्या तावडीतून करून घेतली. मात्र यामुळे भर शहरातून मुलांचे अपहरण करणाऱ्यांची टोळी पारनेर शहरात सक्रिय झाल्याची चर्चा असून या घटनेची दहशत पूर्ण पारनेर शहरात दिवसभर होती. 

घटनेची माहिती समजताच विद्यालयाचे प्राचार्यांनी सदर मुलाची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. याबाबत बाळासाहेब ठुबे यांनी पारनेर पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून सदर घटनेचा तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रमेश थोरवे करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना जेरबंद करण्याची मागणी नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.