पोखरी बाळेश्वरच्या घटनेकडे आमदारांचे दुर्लक्ष,दोन्ही आमदारांना पठार भागाचा विसर !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर गावात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यामुळे वडिल आणि पत्नीवर दु:खाचे डोंगर कोसळले. अशावेळी कुटुंबाला धीर देण्यासाठी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे हे कार्यकर्त्यांसह धावपळ करत आले. मात्र, ज्यांची जबाबदारी या कुटुंबाला मदत मिळवून देण्याची आहे. ते आमदार म्हणून मिरवणारे लोकप्रतिनिधी मात्र या कुटुंबाकडे फिरकलेच नाही. ही सामाजिक अस्वस्थता आता फटांगरे कुटुंबासह अनेकांना असह्य होत आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांना पठार भागाचा विसर पडला की, काय असा प्रश्नही आता या निमित्ताने निर्माण झाला आहे.ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

पठार भागावरील पोखरी बाळेश्वर याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत असलेल्या अशोक संतू फटांगरे (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने नैराश्यातून बुधवारी मध्यरात्री आपली मुलगी अस्मिता व मुलगा प्रफुल्ल या दोघांचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला.

त्यानंतर त्याने स्वत:ही दोरीच्या साहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यामुळे मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने संगमनेर तालुक्यासह जिल्हा हादरला होता. त्या दोन निष्पाप मुलांनी बाहेरचे जगही पाहिले नव्हते. पण तरीही त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

घटनेच्या पाचव्या दिवशी रविवारी दुपारी खा.लोखंडे यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, पं.स. सदस्य अशोक सातपुते आदी कार्यकर्त्यांसह भेट देवून फटांगरे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी खा.लोखंडे यांनी सर्व घटनेची माहिती समजावून घेतली आणि या कुटुंबाला शासकीय योजनांची जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल याबाबत तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना सूचना केल्या.

या घटनेला सहा दिवसांचा कालावधी झाला आहे. पण अद्यापही या भागाचे लोकप्रतिनिधी आ. वैभवराव पिचड यांनी या कुटुंबाला भेटही दिली नाही, तर नेहमीच पठार भागाच्या सुख-दु:खात सहभागी होणारे आमदार बाळासाहेब थोरात हेही पोखरी बाळेश्वरला येथे आले नाही. अनेकांचे मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे किती गांभीर्य या नेत्यांना आहे हे यावरुन दिसून आले आहे. 

नैराश्यातून अशोक फटांगरे याने आपल्या मुलांसह स्वत:ही आत्महत्या केली. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे. मात्र, याचे कोणालाच गांभीर्य नाही. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे निधन किंवा दशक्रिया विधी आदी काही कार्यक्रम असल्यास ही नेते मंडळी आवर्जुन त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात. मात्र, एवढी मोठी घटना घडूनही ही नेते मंडळी का आली नाही, का त्यांना या घटनेचा विसर पडला ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.