नाष्ट्याची हातगाडी लावण्यासाठी हफ्ता देण्यास नकार दिल्याने तलवारीने वार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील चौपाटी कारंजा येथे नाष्ट्याची हातगाडी लावण्यासाठी हफ्ता मागितला असता तो देण्यास नकार दिल्याने ६-७ जणांनी मारहाण करून तलवारीने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश राजेंद्र भागानगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या चुलत्यांना अतुल वाघचौरे, भैय्या रोहकले, धीरज रोहकले व इतर ३-४ जणांनी (सर्व रा. नालेगाव) चौपाटी कारंजा येथे नाष्टयाची गाडी लावायची असेल तर आम्हाला रोज ५०० रूपये व आत्ता ५ हजार रूपये द्या अशी मागणी केली. 

ते देण्यास नकार दिला असता वाघचौरे याने किशोर याच्या डोक्यात तलवारीने वार केला व इतर आरोपींनी त्यांच्या चुलत्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व ६ हजार रूपयांची रक्कम बळजबरीने काढून घेतल्याचे म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.