कर्जमाफीची रक्कम देताना मुंबई विद्यापीठाचा निकाल पुढे ढकलण्यासारख करू नका !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दसरा सणापूर्वीच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने सोमवारी धरणे आंदोलन केले. कर्जमाफीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा व्हावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम जमा न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन सुरू केले जाईल, अशा इशारा देखील यावेळी देण्यात आला. ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे नगर दक्षिण प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर प्रमुख रावसाहेब खेवरे, अनिल कराळे, संदेश कार्ले, शरदाभाऊ झोडगे, रामदास भोर, रफिक शेख आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून दोन महिने झाले आहेत. तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. सरकार नुसते कागदपत्रांच्या छाननीत दंग आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार असा सवाल खासदार सदाशिव लोखंडे व प्रा शशिकांत गाडे यांनी उपस्थित केला. 

कर्जमाफीचा लाभ मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी सण देखील साजरे केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात म्हणतात की, शेतकऱ्यांना दसरा सणापूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग होईल. पण प्रत्यक्षात कारवाईला दोन महिने लागू नका, असा देखील गाडे म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम देताना मुंबई विद्यापीठाचा निकाल पुढे ढकलण्यासारखी करू नका, असा टोला संदेश कार्ले लगवला. .

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हे शुभकार्य आहे. त्यावर मुहूर्त नको. कार्यवाही हवी, अशी अपेक्षा अनिल कराळे व शरदराव झोडगे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना मुख्यमंर्त्यांनी तारीख पे तारीख असे धोरण करू नये. आता प्रत्यक्षात कृती हवी. ही न झाल्यास शिवसेनेतर्फे राज्यभर आंदोलने केले जातील, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे व रावसाहेब खेवरे यांनी यावेळी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.