ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त पुन्हा रंगणार विखे-थोरात सत्ता संघर्ष.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दहा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जि.प. व पं.स. निवडणुकीची पुनरावृत्ती होत ना. विखे व आ. थोरात गट आमने-सामने येणार असल्याने दोघांमधील सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून येणार असल्याचे चित्र सध्या सगळीकडे पहावयास मिळत आहे. 

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

२००९ नंतर झालेल्या पुनर्रचित शिर्डी विधानसभा मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील जोडण्यात आलेल्या गावांमध्ये ना. विखे यांनी विकास कामांच्या माध्यमातून नव्या व जुन्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. आश्वी परिसरात आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुरमीकरणाच्या माध्यमातून आ. थोरात यांचे कार्यकर्तेही सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आश्वी व जोर्वे परिसरात ग्रामपचांयत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघ व संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, उंबरी-बाळापूर, सादतपूर, ओझर खुर्द, रहिमपूर, कणकापूर, निबांळे, हंगेवाडी, कोल्हेवाडी व जोर्वे या दहा प्रतिष्ठेच्या ग्रामपचांयतींचा पचंवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत असून दि. २२ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज छाननी दि. २५ रोजी असून दि. २७ रोजी अर्ज माघारी घेता येणार आहे. ७ ऑक्टोबरला या दहा ग्रामपचांयतींसाठी मतदान व दि. ९ रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील काँग्रेसचे दोन दिग्गज नेते ना. विखे व आ. थोरात व त्याचे स्थानिक कार्यकर्ते पुन्हा एकदा समोरासमोर भिडणार असल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष आश्वी व जोर्वे गटातील ग्रामपंचायत निवडणुकांकडे लागले आहे.

दरम्यान, ना. विखे गटाकडे निमगावजाळी, उंबरी-बाळापूर, ओझर खुर्द, सादतपूर व कोल्हेवाडी या ग्रामपचांयतीची सत्ता आहे. आ. थोरात गटाकडे जोर्वे, रहीमपूर व कनकापूर या ग्रामपचांयतींची सत्ता आहे. हंगेवाडी व निबांळे येथे बिनविरोध निवडणूक करत ना. विखे व आ. थोरात गट एकत्रितरित्या सत्तेत सहभागी आहेत.

जिल्हा परिषद व पचांयत समिती निवडणुकांमध्ये जोर्वे व आश्वी गटामध्ये ना. विखे यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म देत निवडणुकीत उभे केल्याने आ. थोरात यांनी आश्वी व जोर्वे गटात अपक्ष उमेदवार उभे करत बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यातील या दिग्गज नेत्यांनी आपली सर्व ताकद व यंत्रणा कामाला लावली. ना. विखेंनी आश्वी, तर आ. थोरातांनी जोर्वे गट आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

ग्रामपचांयत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ना. विखे गटाकडून जनसेवा विकास मंडळ व आ. थोरात गटाकडून शेतकरी विकास मंडळाचे स्थानिक कार्यकर्ते सत्तेचा गुलाल उधळण्यासाठी आमने-सामने उभे ठाकणार असले तरी अंतिम निर्णय हा ९ ऑक्टोबर रोजीच स्पष्ट होईल.

सरपंच पदासाठी रस्सीखेच.
पहिल्यांदाच ग्रामपचांयत निवडणुकीत सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे. सत्ता एकीकडे तर सरपंचपद दुसरीकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. विखे व थोरात गटाकडून सर्व स्तरारातील मतदारांना मान्य होईल अशा उमेदवारांचा शोध अंतिम टप्प्यात आहेत. दुसरीकडे सरपंच हा जनतेतून निवडला जाणार असल्याने हौशे नौशेही गुडघ्याला बांशीग बांधून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करत आहेत..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.