विजेच्या खांबावरून पडल्याने घोडेगावचे लाईनमन राजेंद्र निकम यांचा अपघाती मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घोडेगाव व हिरडगाव येथे वीज मंडळाचे लाईनमन म्हणून काम करणारे राजेंद्र सोनबा निकम ( वय ३८ ) हे विजेच्या खांबावरून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना घोडेगाव येथील होंडा माळावर घडली.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

वीज मंडळाचे ठेकेदार श्री दत्तात्रय झिंजुर्डे यांच्या अधिपत्याखाली राजेंद्र निकम हे बाह्यस्रोत लाईनमन म्हणून काम करीत होते. ते हिरडगाव आणि घोडेगाव ही दोन गावे सांभाळीत होते. घोडेगावच्या होंडा माळावरील फॉल्ट काढण्यासाठी तेथील डी.पी. चे डी.ओ. उतरून ते विजेच्या खांबावर चढले , तरीही त्या लोखंडी खांबावर विद्युत प्रवाह आल्याने त्यांच्या डाव्या तळ हाताला शॉक बसला आणि ते खांबावरून खाली कोसळले.डोक्याला मार लागून ते जागीच गतप्राण झाले.

सबस्टेशन मधून त्यांनी शट डाऊन घेणे आवश्यक होते. पण सबस्टेशन मध्ये काम करणारे वीज कर्मचारी स्टेशनमध्ये हजरच नसतात व ते लवकर शट डाऊनही देत नाहीत. म्हणून किरकोळ फॉल्ट साठी शट डाऊन न घेता डी.ओ. उतरून काम उरकण्याचा प्रयत्न वायरमन करतात.

राजेंद्र निकम या परिसरात शेतक-यांचा खराखुरा मित्र होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली,आई आणि एक भाऊ आहे. अंत्यविधीसाठी बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर व परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.