कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आरक्षण असल्यापासून आतापर्यंत बौद्धांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे अद्यापही शिर्डी लोकसभा मतदार संघातील समाजाच्या समस्या आहेत, तशाच आहेत. या सर्व समस्या सोडवून समाजाचा विकास करायचा असेल तर मतदार संघातील बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केले.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे केंद्रीय व महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्याचे अध्यक्ष विकास निकम तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. राहुल मुन, राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम खडसे, राज्याचे युवानेते भैय्यासाहेब इंदिसे, दिवाकर आर एस. बिहार, विजयसिंग यादव मध्यप्रदेश, दौलतराम दिल्ली, भहिरट गोयल उत्तरप्रदेश, सुभाष देशावर पंजाब, एम. अलेकझांडर जम्मू-काश्‍मिर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय भांमरे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विजय साळवे, नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील निकाळे, ऍड. राहुल कांबळे, शैलेश पोटभरे, दिगंबर गायकवाड, आदेश पगारे उपस्थित होते.

इंदिसे म्हणाले की, मागील पंचवार्षिंक निवडणुकीत आरपीआयच्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पराभवाची कारणे शोधण्यासाठी चिंतन बैठक झाली. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी एकमेकांचा मतभेद विसरून पक्षाच्या व समाजहिताचे ध्येय ठेवायचे आहे. निवडणुकांमध्ये सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद याकरिता उमेदवारांची छाननी करत आहोत. ग्रामपंचायतचे सरपंच थेट जनतेतून निवडण्यास आमचा विरोध आहे.

आम्ही या निर्णयाचा निषेध करतो, तसा ठरावही घेण्यात आला. तरूणांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु त्यांच्यापर्यंत त्या पोहचत नाहीत. लवकरच जिल्हास्तरीय बेरोजगारांचे मेळावे घेवून शासनाच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.