उद्याचं 'भविष्य' शिक्षकांच्या हाती: महादेव गवळी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आजच्या जागतीकीकरणाच्या युगामध्ये अन्न, वस्त्र व निवारा यांबरोबरीनेच आरोग्य व शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत.त्यापैकी दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असून योग्य पद्धतीने अंमलात आणण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,असे प्रतिपादन पत्रकार व आत्मनिर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी केले.खारे कर्जुने (ता.नगर) येथे शिक्षक दिना निमित्त आयोजित शिक्षकांचा सत्कार व 'एकसंध: क्रांतीची विचारधारा' व्याख्यान उपक्रमाअंतर्गत ते बोलत होते.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

जागतीकीकरणामुळे गरजांची व्याप्ती व स्वरूप बदलत गेले.आजच्या पालकांना इंग्रजी हीच भाषा मुलांसाठी सर्वस्व असल्याची भासवले जातेय.मात्र इंग्रजी शाळा व मराठी शाळा यांच्या स्पर्धांमध्ये पालकांना आर्थिक झळ तर बसतच आहे.बरोबरच पाल्यांचेही 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था होऊन भविष्याशीच खेळ मांडला जात आहे.

शासनाने त्यासाठी मराठी शाळांचा बौद्धीक व भौतिक दर्जा वाढवण्यावर भर द्यायला हवा.आजची गुणदानाची पद्धत अतिशय चुकीची असून त्यामुळे फक्त मार्कांची सूज वाढत जाऊन खरे मूल्यमापन होत नाही.अशा चुकीच्या मूल्यमापन व्यवस्थेविरोधात शिक्षकांनी लढा द्यायला हवा,त्यासाठी पालकही तुम्हाला पाठबळ देतील.मराठी शाळांमध्ये शिक्षणा बरोबरच संस्कारही दिले जातात.

मूल्यशिक्षण देऊन सामाजिक बांधीलकीची जाणिव विद्यार्थ्यांमध्ये मध्ये निर्माण केली जाते.हे संस्कार इतरत्र मिळत नाहीत.म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजीचा बाऊ न करता मराठी शाळांमध्येच शिक्षण द्यावे.शिक्षकांनीही जबाबदारी घेऊन पालकांच्या विश्वासास पात्र व्हावे.विविध क्षेत्रातील मोठमोठ्या नामवंत व्यक्तींनी आपल्या मातृभाषेतच शिक्षण घेऊन आपले नाव उज्वल केले आहे.संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याचे काम पालक व शिक्षकांनी समन्वयाने करावे.

यावेळी नगर कृ.उ.बा.समितीचे संचालक,युवा नेते अंबादास शेळके, मुख्याध्यापक पिसे सर, डाॅ.बी.एम.शिंदे,डाॅ.बाळासाहेब शेळके,डाॅ.सुनिल पादीर, कामगार नेते चंद्रकांत ढवळे,रशीद सय्यद,जान मोहम्मद सय्यद, भाऊसाहेब तांबे, विक्रम निमसे,अमोल शिंदे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अमोल निमसे यांनी केले तर आभार रूपनर सर यांनी मानले.

अहमदनगर येथील विद्यार्थी-तरूणांचा 'एकसंध' हा सोशल मीडियाच्या माध्यमातून,सामाजिक जाणीव ठेऊन एकत्रीत आलेला ग्रुप आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर सोशल मीडियावर फक्त चर्चाच न करतात प्रत्यक्ष व्याख्यान व चर्चासत्राच्या माध्यमातून या ग्रुप मार्फत प्रबोधनपर उपक्रम राबवले जात आहेत.गणेशोत्सवात या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी यशस्वीरित्या व्याख्यानं व परिसंवाद कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले.त्यास नागरिकांचाही प्रतिसाद मिळाला.सामाजिक जाणिवेतून काम करू इच्छिणाऱ्या तरूणांनी, "एकसंध:क्रांतीची विचारधारा" या व्याख्यान,चर्चासत्र आयोजन व प्रत्यक्ष सहभागासाठी 808791119 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.