रस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरपरिषदेच्या कृपादृष्टिने शिवार जलयुक्त होण्याऐवजी रस्तेच जलयुक्त झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरातील प्रभाग क्र २० मधील , म्हेञे वस्ती (फुलमळा) येथे रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, विध्यार्थाना अक्षरशः दोन फूट खड्याच्या रस्त्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

म्हेञे वस्तीवरील रस्ता पाऊस पडल्यानंतर अत्यंत खराब असल्यामुळे परिसरातील नागरिक ,शाळकरी मुले, मुली जामखेड ला येणे अवघड होऊन बसत आहे ग्रामीण भागाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्वासन देण्यार्या पुढार्यांना सुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनास्था पाहता येथील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
 
शहरापासून १ किमी अंतरावर असणाऱ्या ३०० लोकवस्ती असणारी म्हेत्रे वस्ती ,जुना रत्नापूर रस्ता ,अहिल्या नगरला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे ,पण गेल्या अनेक वर्षपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकंना मरणयातना भोगाव्या लागत आहे अनेक वेळा पालकमंत्री राम शिंदे याना निवेदन देऊनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे 

लोकप्रतिनिधींना अनेकदा साकडे घालून या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, नगरपरिषद ,बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांना कळेना व लोकप्रतिनिधींना समजेना अशीच अवस्था तालुक्यातील सर्वसामान्यांची झाली आहे. आंधळ दळतय.., असे बोलत ग्रामस्थ संताप व्यक्त करीत असल्याचे चित्र ग्राीमण भागात दिसून येत आहे.

तसेच शहरातील रस्ते दरवर्षी बांधकाम विभागाकडून किरकोळ डागडुजी केल्यानंतर निधी उपलब्ध करून रस्त्याच्या समस्या सोडविल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली असता अत्यंत नित्कृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदार केवळ निधी उकळण्याचे काम करीत असल्याचे अनेक उदाहरणे जामखेड तालुक्यात पाहावयास मिळतात. 

अनेक गावांच्या रस्त्यांबाबत निधी उपलब्ध होऊनही काम होत नसल्याने ग्रामस्थ बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे हेलपाटे मारतात. पावसाच्याकाळात शिवार जलयुक्त दिसण्याऐवजी रस्तेच जलयुक्त दिसत असल्याने सरकारने तालुक्याला रस्त्याला जलयुक्त केल्याप्रकरणी दखल घेण्याची मागणी सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

जामखेड येथील मेह्त्रे वस्ती फुलमळा येथील रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे. तरीही रस्ता नसल्याने मयत माणसाचे प्रेत झोळी करुन आणावे लागत आहे. अशी ही मेह्त्रे वस्तीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षी नितीन मेह्त्रे या विद्यार्थ्यांला रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने तो मयत झाला. पाउस पडल्यानंतर विद्यार्थी व शाळेत येत नाही.तरी शासनाने तत्काळ दाखल घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नगरपरिषद समोर आंदोलन करण्यात येईल - राजेंद्र म्हेत्रे नागरिक म्हेत्रे वस्ती जामखेड.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.