विजेच्या धक्क्यामुळे जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील प्रवरा उजव्या कालव्याजवळून गेलेल्या कनोली एक्सप्रेस विद्युत वाहिनीची तार उसाच्या शेतात तुटून तारेचा जोरदार धक्का बसल्याने गंभीर जखमी झालेले शिंदे वस्तीवरील रमेश लहानू शिंदे (वय ५१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

प्रवरा उजव्या कालव्यालगत रमेश शिंदे यांची शेतजमीन व वस्ती आहे. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील उसाच्या शेतात मोठा अवाज झाला. काय झाले, हे पाहाण्यासाठी शिंदे यांनी तिकडे धाव घेतली. पाऊस व पाटपाण्याच्या पाझरामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

तुटून पडलेली विजेची तार त्यांच्या नजरेस न पडल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा कंबरेपासून खालील भाग भाजला होता. शिंदे यांना तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ भाऊ, भावजया, २ मुली, जावई, २ मुले असा मोठा परिवार आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता शोकाकूल वातावरणात आश्वी खुर्द प्रवरातिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले, पोलीस पाटील बापुसाहेब गायकवाड, माधव भोसले, उपसरपंच ॲड. अनिल भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.