महसूलच्या कारवाईला वाळूतस्करांचा हातभार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील घोड,भीमा नदीपट्टयात रात्रंदिवस जोरदार वाळूतस्करीचा व्यवसाय चालतो.यात तालुक्यातील वाळूतस्करां प्रमाणेच पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर तालुक्यातील वाळूतस्करांचा देखील समावेश आहे. आजपर्यंत तालुक्यातील व तालुक्याबाहेरील सर्वच वाळूतस्कर एकोप्याने व एकमेकांना सहकार्य करत इमानदारीने वाळूची तस्करी करत होते. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

मात्र अत्यंत कमी वेळात व कमी कष्टात मात्र बक्कळ पैसा मिळवून देणारा व्यवसाय, म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार याकडे आकर्षित झाले.त्यामुळे तालुक्यात वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अल्पावधीतच वाढली. त्यातून त्यांच्यात निर्माण झालेली स्पर्धा, वाळूविक्रीच्या दरात स्पर्धेतून होणारी दर तोडातोडी, यामुळे जुने वाळूव्यावसायिक चांगलेच मेटाकुटीस आले. 

त्यामुळे या जुन्या व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांना जेरीस आनण्यासाठी आपले अनेक पंटर कामाला लावले आहेत. हे पंटर महसूल ,स्थानिक पोलिस प्रशासन,तसेच एका विशेष शाखेस या बाबत इत्यंभूत माहिती पुरवतात. व त्यानुसारच ही कारवाई केली जात असल्याचे हा व्यवसाय करणारे खासगीत बोलून दाखतात. 

तसेच तालुक्यात सर्वत्र महसूलच्या कारवाई बाबतही दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहे.मुळात या शाखेच्या लोकांना वाळूतस्करांवर थेट कारवाईचा अधिकारच नाही. तरीसुद्धा आर्थिक हव्यासापोटी हा प्रकार घडत आहे. या सर्व प्रकारामुळे काही वाळूव्यावसायिक या क्षेत्रापासून दुरावले आहेत. 

शिवाय जे जुने व्यावसायिक या वाळूतस्करीत टिकून आहेत. ते नव्याने या व्यवसायात शिरकाव करू पाहणाऱ्यांना हटवण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत. यासाठी हे जुने वाळूतस्कर चक्क महसूल यंत्रणेचाच वापर करत असल्याची देखील आता दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

जुन्या वाळूतस्करांचे महसूल खात्यातील काहींना नवीन वाळूतस्करांच्या लोकेशनची जाणीवपूर्वक माहिती देऊन त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई घडवून आणत असल्याची देखील चर्चा ऐकायला मिळत आहे.या प्रकारा विरोधात एका नदीपट्टयातील एका स्थानिक युवा नेत्याने असंतोष व्यक्त केला असून, महसूलचे हे धोरण चुकीचे असून, यंत्रणेकडून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप या नेत्याने खाजगीत केला आहे. 

जर प्रामाणिक कारवाई करायची असती तर मग स्थानिक वाळूतस्कर महसूलच्या का हाती लागत नाही. किंवा अशा स्थानिक वाळूतस्करांवर कारवाई का होत नाही. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील या युवा नेत्याने सांगितले.

जिल्ह्यातील एका विशेष शाखेचे श्रीगोंदा तालुक्यातील वाळूतस्करांकडे विशेष लक्ष असल्यामुळे त्यांच्या त्रासाला वाळूतस्कर वैतागले आहेत. परंतु मूळातच वाळूउपसाच अवैध मार्गाने केला जात आहे.त्यामुळे याबाबत तक्रार तरी कुणाकडे आणि कुणी करायची असा प्रश्न आहे.परिणामी तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार सध्या सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.