श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात टाकळीभान येथे वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू झाला. राधाकिसन उर्फ सोमनाथ शिवाजी जाधव (वय २८, रा. लक्ष्मीवाडी, टाकळीभान) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. 



ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा होता. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी सुमन गंगाधर पवार यांच्या गट क्र ५० मध्ये असलेल्या शेतात लक्ष्मीवाडी येथील मेंढपाळ जाधव हे आपल्याकडील मेंढ्या चारत होते. अचानक पाऊस आल्याने ते एका झाडाखाली थांबले होते. यावेळी वीज कोसळल्याने जाधव हे गंभीर जखमी झाले. 

त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील संतलूक रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, तहसीलदार सुभाष दळवी यांनी याप्रकरणी तलाठी ज्ञानेश्वर हडोळे यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून तातडीची मदत म्हणून चार लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.