सरकारची धोरणे शेतकरी व सहकाराच्या विरोधी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक नैसर्गिक आपत्तींवर मात करून शेतकरी कष्टाने शेतीमाल पिकवतो. मात्र कवडीमोल भावाने विकतो. फक्त शेती उत्पादनावर निर्बंध लादणाऱ्या भाजपा सरकारने ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी शेतकरी व सहकाराच्या विरोधी धोरण घेतले असल्याची टीका गुजरात काँग्रेस उमेदवारी छाननी समितीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

संगमनेर येथील जिल्हा बँकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संगमनेर शेतकी संघाच्या ५८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात होते तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, पंडीतराव थोरात, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, हरिभाऊ वर्पे, अजय फटांगरे, निशाताई कोकणे, व्यवस्थापक अनिल थोरात आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते, शेती औजारे, साहित्य, माफक दरात मिळण्यासाठी ५८ वर्षांपूर्वी हा शेतकी संघ सुरू केला. शेतकऱ्यांना स्वस्तात शेतीपुरक साहित्य पुरवत त्यांचा उत्पादीत शेतीमाल खरेदी करणे व नफा थेट शेतकऱ्यांना देणे ही परंपरा या संघाने आजपर्यंत जपली आहे. विविध उत्पादनांची विक्री केली आहे.

आज राज्यात संगमनेरचा हा शेतकी संघ प्रथम ठरला आहे. शेतकी संघ हा संगमनेरच्या सहकारी संस्थांची मातृ संस्था आहे. सहकार ही आपली ताकद असून शेतकरी व ग्रामीण विकासाचे मोठे माध्यम आहे. परंतु सध्याच्या सरकारची धोरणे शेतकरी व सहकार विरोधी आहेत.

 नुकताच कांदा आयात करण्याचे चुकीचे धोरण घेतले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे व चेअरमन शिवाजीराव थोरात यांची भाषणे झाली. मॅनेजर अनिल थोरात यांनी नोटीस वाचन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार उपाध्यक्ष संपतराव डोंगरे यांनी मानले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.