कोपरगाव - संगमनेर रस्त्याला लागलेले ग्रहण कधी सुटणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव -संगमनेर रस्त्याची गेल्या काही महिन्यांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. यामुळे रस्ता थोडासा चांगला देखील झाला. परंतु, पावसाळा सुरू झाला व या रस्त्याची पुरती चाळण झाली असून, कोपरगाव-संगमनेर रस्त्याला लागलेले ग्रहण कधी सुटणार? अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

कोपरगाव-संगमनेर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या तसेच पुणे ते इंदोर अशा मोठ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव फाटा या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली होती. मागील काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले.

मात्र, या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी प्रलंबित असून, तयार करण्यात आलेला हा रस्ता अल्पशा पावसामुळे पूर्णतः खराब झाला आहे. या रस्त्यावरचा प्रवास लोकांच्या जीवावर बेतणारा ठरत असून, खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

हा रस्ता “बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधला असून, 30 ऑगस्ट 2006 पासून 2 जानेवारी 2026 पर्यंत या रस्त्याचा ताबा एका टोल कंपनीकडे होता. या कालावधीत रस्त्याची दुरुस्ती करण्याचे कामही या टोल कंपनीचेच होते. त्यानंतर आघाडी सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार हा पथकर नाका बंद करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे पूर्ण रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले.

यानंतर रस्त्याची कधीही चांगल्या प्रकारे डागडुजी करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कंत्राट विविध ठेकेदारांना देण्यात आले होते. कंत्राट देऊनही रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच, रस्त्याचे साईडपट्टेदेखील खचल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे.

हा रस्ता जड वाहतुकीच्या योग्य नसतानाही नगर-मनमाड रस्त्याने जाणारी सर्व जड वाहतूक आठवड्यातून विविध दिवशी झगडे फाटा-तळेगाव मार्गे वळवण्यात येते. अंजनापूर फाट्यावरील छोट्या पुलाचे कठडे तुटल्याने येथे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कायम ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत असून, अनेकांना पाठदुखीचा व मणक्‍याचा त्रास होत आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्यानी रस्त्याच्या कामात लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

या रस्त्याची वाहतूक क्षमता अगदी कमी आहे. रस्ता बांधण्यात आला तेव्हा हा जिल्हा मार्ग होता. परंतु, आता राज्य मार्ग म्हणून मंजुरी भेटली आहे. यावर शिर्डीमार्गे जाणारी वाहतूक कायम वळविण्यात येत असल्याने वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त होत असून त्यामुळे रस्ता मोठ्या प्रमाणात खराब होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.