श्रीगोंद्यात आढळले एकाच दिवशी दोन मृतदेह.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात एकाच दिवशी एक तरुणी व एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील म्हातारपिंप्री रेल्वेस्थानकानजिक एक युवकाचा रेल्वेला धडकून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत पारगाव सुद्रिक येथील विहिरीत एका तरूणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडल्या आहेत. 



ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यात आज सकाळी म्हातारपिंप्री रेल्वेस्थानकानजीक साडेसात वाजण्याच्या सुमारास एक तरुण रेल्वे रुळावर चालत येऊन रेल्वेला धडकला. रेल्वे चालकाने याबाबत स्टेशनमास्तराला माहिती दिली.

हा मृतदेह शहरातील दत्तवाडी येथून बुधवार दि.३० संध्याकाळपासून घरातून गायब असलेल्या सीताराम पोपट खेतमाळीस वय २९ या तरुणाचा असल्याची खात्री पटली. शवविच्छेदनानंतर अतिशय शोकाकुल वातावरणात सीताराम याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताराम यांच्या मृत्यूबाबत रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान सीताराम याचे श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरु असतानाच पोलिसांना पारगाव सुद्रिक येथे आडात एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती समजली. त्यानंतर लगेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी आपल्या फौज फाट्यासह पारगाव सुद्रिक या ठिकाणी धाव घेतली आणि आडातून त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला असता. सदरची मृत मुलीचे नाव रूपाली असून ती पारगाव येथील राहणारे नारायण आल्हाट याची मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.

साधारण त्या मुलीचे वय १८ च्या दरम्यान सांगितले जात होते मात्र मृत्यूचे कारण समजू शकले नाही, त्यानंतर रुपालीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यानंतर रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रुपाली आल्हाट हिच्या मृत्यूबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेशवर पठारे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.