शिर्डीत २५ वर्षांच्या तरुणाचा खून,पोलिसांसमोर तपासाचे आव्हान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आठ दिवसांपूर्वी झालेली खूनाची घटना ताजी असतानाच शिर्डी पोलिसांसमोर २५ वर्षांच्या तरुणाच्या खुनाचे आव्हान उभे राहिले आहे. काल (दि. ३०) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एक हजार रुमच्या पाठीमागील वाघ वस्तीकडे जणाऱ्या रस्त्यावर एक तरूण जखमी अवस्थेत आढळून आला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता, तो मयत झाल्याचे घोषित करण्यात आले. 




ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या तरुणाच्या हातावर बदामाचे चिन्ह, इंग्रजीत एस, तर उजव्या हाताच्या दंडावर शारदा हे नाव गोंदलेले असून डाव्या हातावर जखमेचे मोठे वर्ण आहे. त्याच शेजारी आई असे गोंदलेले आहे. याबाबत अधिक माहिती अशी : बुधवारी (दि.३०) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिर्डीतील वाघ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका तरुणाला जबर मारहाण केल्याची महिती पोलिसांना मिळाली.

संबंधित तरुणावर हत्याराने डोक्यावर व चेहऱ्यावर मोठे वार केल्याने तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी लगतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो मयत झाल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सदरचा तरुण धष्टपुष्ट व उंचपुरा असल्याने त्याने प्रतिकार केला असावा. मात्र, पोटात मद्याचे अंश सापडल्याने या खुनात आरोपीची संख्या दोन पेक्षा अधिक असू शकते. जिल्ह्यात व लगतच्या परिसरात किंवा सिमेलगतच्या जिल्ह्यात कोणी बेपत्ता आहे का या दृष्टीनेही पोलीस तपास करित आहेत. 

त्याच्याजवळ जवळपास ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्याच्या अंगावर फिक्कट तपकिरी रंगाचा चौकटीचा शर्ट, कॉटन जीन्सची पॅन्ट गळ्यात पिवळ्या धातूची चैन, तर बोटात धातूची अंगठी आहे. त्याच्याजवळ एक शनीशिंगणापूर येथील दुकानाचे व्हिजिटिंगकार्ड सापडले होते. 

मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. जर मयताबाबत कोणाला माहिती असल्यास शिर्डी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आला आहे. अधीक तपास पो.नि. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दहिफळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.