गौतम पब्लिक स्कूल हॉकीत करणार जिल्ह्याचे नेतृत्व.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगरच्या वतीने सोनईला झालेल्या जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलने १५ व १७ वर्ष वयोगटात विजेतेपद, तर शेवगाव येथील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावर नेतृत्व करण्याचा बहुमान प्राप्त करून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

नेहरू हॉकी स्पर्धेच्या सोनई येथील दि. ३१ ऑगस्ट रोजीच्या अंतिम सामन्यात मुळा पब्लिक स्कूलच्या १५ व १७ वर्ष वयोगटाततील दोन्ही संघावर गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने अनुक्रमे २-० व ३-० अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवला. सॉफ्टबॉल स्पर्धेच्या शेवगाव येथील दि.१९ ऑगस्ट रोजीच्या अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या सॉफ्टबॉल संघाने वसुंधरा ॲकेडमी अकोले संघावर विजय मिळवून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे.

हॉकीच्या अंतिम सामन्यात १५ वर्षे वयोगटातील संघाकडून शुभम मोरे, सत्यम छानवाल व अजय गायके यांनी गोल नोंदविले. प्रतिक खडसे याने अप्रतिम गोलरक्षकाची कामगिरी बजावली. संघासाठी कल्पेश माळी, ओम बडवर, घन:शाम आहिरे, तेजस बोरसे व केतन निकम यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ केला. १७ वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूलच्या संघाकडून यशराज खेमनर याने दोन विजयी गोल नोंदविले. ऋषिकेश गायखे याने नेत्रदीपक गोलरक्षण केले. संघासाठी संकेत शिंदे, रेहान शेख, कृष्णा पाटील, निखील पाटील, युर्तिक घुमरे व सुमित घुमरे यांनी यांनी नेत्रदीपक खेळ केला.

सॉफ्टबॉलच्या अंतिम सामन्यात या संघाकडून अनिकेत येवला, कर्ण गवळी, महेश सातव, ऋषिकेश बिरारी, अमित भोसले व किशोर जोरवर यांनी अप्रतिम खेळाचे घडविले. गौतमच्या हॉकी व सॉफ्टबॉल संघास फिजिकल डायरेक्टर, सुधाकर नीलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, प्रशिक्षक कन्हैया गंगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.