हरिगाव मतमाउली यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र मारिया [मतमाउली] ची यात्रा सालाबादप्रमाणे हरिगाव येथील संत तेरेजा चर्च प्रांगणात ९ सप्टे.रोजी यात्रेचा ६९ वा महोत्सव ६ लाखाचे वर भाविकांचे उपस्थितीत संपन्न झाला.फातीमाची माता मारिया दर्शनाचे हे शतकवर्ष होते.यात्रा शुभारंभनंतर यात्रेपर्यंत रोज डोंगरासमोर सायंकाळी भक्ती,प्रार्थना झाली.यात्रापूर्व भक्तीस १ जुलै पासून प्रारंभ झाला होता.


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

यात्रेचा शुभारंभ दि ३१ ओगस्ट रोजी सायंकाळी पुणे धर्मप्रांतांचे महागुरुस्वामी रा.रे.डॉ थोमस डाबरे,यांच्या हस्ते ध्वजारोहाणाने झाला. ८ सप्टे. रोजी पवित्र मारियाचा जन्मदिन नोव्हेना झाल्यावर धर्मगुरूच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

यात्रादिनी सकाळी ८-३० वाजता डोंगरासमोर जपमाळ,नोव्हेना झाल्यावर पायस रॉड्रीक्स डॉमनिक रोझारीओ रिचर्ड अंतोनी स्थानिक धर्मगुरूंच्या हस्ते विधिवत मतमाउलीच्या शिरावर मुकुट चढविणेत आला.,व भाविकांच्या दर्शन्र रांगेने यात्रा शुभारंभ,झाला.

त्यावेळी फा.संजय पारखे यांच्या आई मारिया या सीडी चे अनावरण करण्यात आले.दुपारी ४-३० वाजता भव्य मिस्सा बलिदान प्रसंगी प्रमुख अतिथी नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानीयल यांचे पवित्र मारिया जीवन व कार्य याबद्दल धार्मिक मार्गदर्शन झाले.

त्यावेळी हजारो भाविक उपस्थित होते..सकाळपासूनच श्रीरामपूर ते हरिगाव रस्त्यावर पदयात्रेने गर्दीने रस्ते फुलून गेले होते.पुणे ते हरिगाव रविवारी निघालेले भालेराव,कें व्ही त्रिभुवन,फ्रान्सिस पंडित,अंतोन त्रिभुवन आदी शनिवारी दर्शनाला आले.नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राजेंद्र पवार, सुभाष गांगड, स्नेहल खोरे, जयश्री शेळके, जितेंद्र छाजेड, शामलिंग शिंदे, केतन खोरे, रोहित शिंदे, आदित्य आदिक. पापा पठाण, आदींनी सकाळीच दर्शन घेतले.आ.भाऊसाहेब कांबळे, दीपकअण्णा पटारे, सिद्धार्थ मुरकुटे, भाऊसाहेब बांद्रे तसेच मा.आ.जयंतराव ससाणे,आदींनी मतमाउलीचे दर्शन घेतले.व शुभेच्छा दिल्या.सायंकाळी ७ वा.मारिया मातेचे दर्शन चित्रफित,९ वा भजनसंध्या,इ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था एसटी डेपो श्रीरामपूर यांचेकडून करण्यात आली..वैद्यकीय सेवा उपलब्ध होती.पोलीस उप अधीक्षक अरुण जगताप,पोलीस निरीक्षक पथवे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हरिगाव,उन्दिरगाव,ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ,श्रीरामपूर नगरपालिका,महावितरण, तसेच विविध संघटना संस्था यांचे यात्रेकामी सहकार्य लाभलेबद्दल प्रमुख धर्मगुरू,पायस रॉड्रीक्स,यांनी आभार मानले.डॉमनिक रोझारिओ,रिचर्ड अंतोनी आदी धर्मगुरू,धर्मभागिनी,ग्रामस्थ हरिगाव,उन्दिरगाव व चर्च संलग्नित सर्व संघटना सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.