महानगरपालिकेचे वाटोळे करण्याचा विडा उचललेल्यांनी विकास कामांसंदर्भात बोलू नये.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्रभाग वीसमधील विकासकामांशी आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा काडीमात्र संबंध नसल्याचा दावा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी आज शनिवारी प्रसिद्धपत्रकाद्वारे केला आहे. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आमदार निधीतून झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला होता. त्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांच्या प्रभागांचा देखील समावेश होता. खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या प्रभागाचा देखील उल्लेख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हिशोब देताना केला होता. सुवेंद्र गांधी यांनी मात्र आपल्या प्रभागाच्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा हिशोब चुकला असल्याचे म्हटले आहे.

गांधी म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जो दावा करत आहेत, तो फक्त कांगवा आहे. वास्तविक संग्रामभैय्या जगताप यांनी आमदार निधीतून कोण-कोणत्या प्रभागात कोण-कोणती विकास कामे केली? हे एक गुढच आहे. विकासकामे झाली असती, तर नगरकरांना किमान संबंधित प्रभागात राहणाऱ्या रहिवाशांना ती पहावयास मिळाली असती.

' शहराची आजची अवस्था बकाल झाली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नगरकरांसह देखावे पाहण्यास आलेल्या पाहुण्यांनी हे जवळून पाहिले आहे. शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचे खांब उभारून त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले घड्याळ लावणे म्हणजे विकास नव्हे, असा देखील टोला गांधी यांनी लगवला आहे. 

माजी महापौर शीला शिंदे यांच्या काळामध्ये मुलभूत विकासकामांसाठी आलेल्या राज्य सरकार व महानगरपालिका यांच्या समप्रमाणातील ४० कोटींच्या विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीच्या आमदाराने श्रीफळ वाढवून घेतले आहे. तसेच हा निधी युतीच्या व अन्य नगरसेवकांसाठी असतांना तो केवळ काँग्रेस आघाडीच्याच नगरसेवकांकडे वळविण्याचे कुटील कारस्थान केले असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. .

नगर शहरातील अत्यंत जिव्हाळ्याच्या फेज-दोन या पाणी योजनेचा बोजवारा महापौरपद भुषविताना आजच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने उडविला हेही नगरकरांना उत्तमरित्या माहिती आहे. या फेज- दोनसाठी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आपण आंदोलने का केली नाही ? 

ते काम आजमितीपर्यंतही पूर्ण झालेले नाही. यामागील गौडबंगाल काय? महानगरपालिकेचे वाटोळे करण्याचा विडा उचललेल्यांनी विकास कामांसंदर्भात बोलू नये, असा देखील सल्ला गांधी यांनी यावेळी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.