शेवगावच्या मावा कारखान्यावरील छाप्याची माहिती एसपीं नी मागविली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव येथील मावा बनविणाऱ्या काराखान्यावर घातलेला छापा व नंतर तडजोडीने मिटवण्यात आलेले प्रकरण संबंधीतांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबत चौकशी करुन त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी दिल्याने शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हा अहवाल घेवून तातडीने नगरला रवाना झाले. 


ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

या अहवालावर काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तडजोडीच्या प्रकरणाची पोलीस खात्यातील वरीष्ठांनी किमान दखल घेतली असती तरी अन्न व औषध प्रशासन विभाग अद्यापही झोपेतून का जागा झाला नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

रविवारी (दि.3) एका पथकाने शहरातील मावा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला मात्र कुठलीही कारवाई न करता मोठी तडजोड करुन हे प्रकरण मिटविले. परंतु माध्यमांनी गेली चार-पाच दिवस या विषयी आवाज उठविल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. 

विलंबाने का होईना परंतु चौकशी सुरू झाल्याने समाधान व्यक्‍त होत आहे. मात्र घातक रासायनिक पदार्थापासून बनविला जाणाऱ्या मावा विक्रेत्यांवर कायदेशीर कारावाई करण्याचे अधिकार ज्या अन्न व औषध प्रशासनाला आहे त्यांचे अधिकारी व कर्मचारी वृत्तपत्रे वाचत नाहीत का? की त्यांचे या व्यावसायिकांशी आर्थिक लागेबांधे आहेत, असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शासनाने बंद पाकिटातील गुटखा तसेच सुगंधी तंबाखू व सुपारी या कायदेशीर बंदी घातलेली आहे. तरीही शेवगाव शहर व तालुक्‍यात राजरोसपणे त्याची खुलेआम विक्री होते. पोलीस म्हणतात की, आम्हाला कारावाईचे अधिकार नाहीत. तर मग रविवारी पोलीस विभागातील काही लोक छापा टाकण्यासाठी गेलेच कसे ? 

वास्तविक पाहता अंगलट आलेले प्रकरण दडपण्यासाठी पोलीस कातडी बचाव धोरण घेत आहेत. कोणत्याही अवैध बाबीला प्रतिबंध करण्याचे काम पोलिसांचे असते. पोलीस ठाण्यासमोरच मावा घासून त्याची विक्री होत असताना या व्यावसायिकावर कारवाई करुन त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्याचे काम का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

माव्याचे भाव वाढले…
गेल्या चार पाच दिवसांपासून वृत्तपत्रात माव्या संदर्भात बातम्या सुरू झाल्यानंतर एक दिवस कारवाईच्या भीतीने मावा व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. नंतर दुसऱ्या दिवशी राजरोसपणे उघडली परंतु एका पुडीमागे भाव पाच रुपयांनी वाढवले. तडजोडीत गेलेले पैसे वसूल करण्यासाठी हे भाव वाढवले की भविष्यात कारवाई मिटवण्यासाठी वाढवले या विषयी उलसुलट चर्चा होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.