श्रीगोंद्यात कमळ कधीच फुलणार नाही, मात्र घड्याळाची टिकटिक कायम !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात कमळ फुलवणार असल्याचे स्वप्न माजी मंत्री पाचपुते हे पाहात आहेत.मात्र त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहणार असून, तालुक्यात कमळ कधीच उमलणार नाही. याऊलट घड्याळाची टिकटिकच कायम सुरु राहणार असल्याचे आमदार राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ADVT - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

काल माजी मंत्री पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.जगताप यांच्यावर टीका केली होती. त्याला आज प्रसिद्धीपत्राव्दारे आ.जगताप यांनी उत्तर दिले. त्यांनी यात म्हटले आहे की, मी पाचपुते यांना त्यांच्या ६३ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण वाढदिवसाच्या मुलाखतीत त्यांनी टीका करायला नको होती. परंतु सवयीप्रमाणे त्यांनी केलीच. असा टोलाही लगावला.

३५ वर्षात आपण काय केले हे जनतेने ओळखले आहे. आपण आज जे काही झालात ते शरद पवार व अजित पवार यांच्यामुळेच. तुमच्या काळात घोडच्या कॅचमेंट एरियात ६९ केटीवेअर झाले. त्यामुळे घोडचे पाणी अडवले आणि घोड धरण भकास झाले ही तुमच्या काळातील सर्वात मोठी पुण्याई असून घोड खालील जनतेला मोठी देणगी आहे.

तसेच पुढे या पत्रकात म्हटले आहे की, विसापूर धरण कुकडीत समाविष्ट आहे. तुम्ही लवादाला पटवून तर दिले नाही,मात्र ३५ वर्षे मंत्रीपदी राहून विसापूर धरणाचा कुकडीमध्ये समावेश आहे. हेच आपल्याला कळाले नाही.

मी एक पेट्रोलपंप टाकला हे खरे आहे. त्यासाठी मी शासनाला २० लाख रुपये डिपॉझीट भरुन अधिकृत परवाना घेतलेला आहे. सर्वसामान्य माणसे पोटासाठी जो धंदा करतात तोच मी करत आहे. 

कोट्यवधीची संपत्ती कोणाची ???
त्यांच्या देवदैठण, हिरडगाव कारखाना, परिक्रमा शिक्षण संस्था, साईकृपा डेअरी,ग्रामीण भागात आलिशान राजवाडा, तसेच शिरूर एमआयडीसी १२५ एकर जमीन एवढी मोठी प्रॉपर्टी कशी कमावली असा सवाल जगताप यांनी केला आहे. या फक्त तालुक्यातील प्रॉपट्र्या आहेत,अशा राज्यात व राज्याबाहेर पाचपुते यांच्या अनेक पॉपट्र्या आहेत. ही कोट्यवधीची संपत्ती कोणाची आहे ? यासाठी पैसे कोठून आले ? 

शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडवले, त्यांचे प्रपंच उध्वस्त केले. ठिबकचे कर्ज काढून स्वत: वापरले, सबसिडीही स्वत:च वापरली असा गंभीर आरोपही आ.जगताप यांनी माजी मंत्री पाचपुते यांच्यावर केला आहे..

खरेतर आता पाचपुते कुटुंबाकडे कोणताही मुद्दानाही त्यामुळचे ते आता मुद्यावरुन गुद्यावर आले आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्यावर नियोजीत हल्ला कोणी केला? त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता. असा सवालही आ.जगताप यांनी उपस्थित केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.